शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Video : खरे हिरो! तब्बल 84 तास रुग्णवाहिकेने 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 19:06 IST

देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,332 हून अधिक झाली असून आतापर्यंत 1007 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

तामिळनाडूमधील दोघांनी 84 तास रुग्णवाहिका चालवून 3000 किमी दूर मृतदेह पोहोचवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या या कामाचं सर्वच जण कौतुक करत आहेत. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरममधील एका तरुणाचा चेन्नईमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मिझोरमला पोहोचवण्यात आला. आयजलच्या मॉडेल वेंगमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या विवियन लालरेमसांगा याचा चेन्नईत मृत्यू झाला. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचा मृतदेह गावी नेणं कठीण काम होतं. जेयंतिजरन आणि चिन्नाथंबी या दोन चालकांनी हे आव्हानात्मक काम केलं आहे.

जवळपास 84 तास रुग्णवाहिकेने तब्बल 3000 किमी अंतर पार करत विवियनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. जेयंतिजरन आणि चिन्नाथंबी या दोघांनी रुग्णवाहिका चालवली. त्याचं सर्व कौतुक होत आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करून त्या दोघांचं कौतुक केलं आहे. 'मिझोरम रिअल लाईफ हिरोंचे अशा प्रकारे स्वागत करतं. कारण आमचा माणुसकी आणि राष्ट्रवादावर विश्वास आहे. तुमचे आभार' असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्ताला रिपोर्ट येण्याआधीच दिला डिस्चार्ज अन्...

Coronavirus : लय भारी! Youtube च्या मदतीने 'या' फुलांपासून तयार केलं स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर

Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत 2,200 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांवर

Irrfan Khan Passed away: 'इरफानच्या निधनाने चित्रपट, नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान', पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

 

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू