Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत 2,200 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:53 PM2020-04-29T14:53:23+5:302020-04-29T14:54:45+5:30

Coronavirus : जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे.

coronavirus america death toll total case crosses 10 lakh SSS | Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत 2,200 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांवर

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत 2,200 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखांवर

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 218,187 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,147,623 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 961,871 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा दहा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2 हजार 200 लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2200 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा मोठा आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,035,765 झाली असून आतापर्यंत 59,266 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 201,505 वर गेली आहे. तर तब्बल 27,359 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 23,822 वर गेली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 4,633, स्पेनमध्ये 23,822, इराणमध्ये 5,877, फ्रान्समध्ये 23,660, जर्मनीमध्ये 6,314 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय

Irrfan Khan Passed away: हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का

 

Web Title: coronavirus america death toll total case crosses 10 lakh SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.