Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:36 PM2020-04-29T13:36:05+5:302020-04-29T13:54:03+5:30

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. तर इटली, स्पेन, युरोपमधील परिस्थिती गंभीर आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 212,69 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,087,105 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,332 हून अधिक झाली असून आतापर्यंत 1007 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 7027 तर जगात 935,115 जणांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.

जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास तब्बल 8 लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे.

जर्मनीत नव्या नियमानुसार, सार्वजनिक वाहतूक, लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि दुकानांत सामान खरेगी करताना मास्क लावणे आवश्यक आहे. देशातील 16 पैकी 15 राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे.

मास्क ड्यूटीच्या नावाने तयार केलेल्या या नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे.

दंडाची रक्कम 25 युरो म्हणजेच 2 हजारांपासून ते 10000 युरो म्हणजेच 8 लाख 25 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

बर्लिन आणि ब्रॅंडेनबर्ग यांनी जनतेला मास्क लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. मात्र इतक्या मोठ्या संख्येने दंड आकारला जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

अनेक राज्यांनी मास्क न लावल्यास इतका मोठा दंड भरण्यास नकार दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.