शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : जागा १२ च तरी केंद्रात किंगमेकर, नितीशकुमार यांची राहणार मोठी भूमिका, ‘जदयू’ला मिळू शकते झुकते माप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 05:57 IST

Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि ‘जदयू’ला समान १२ जागा मिळाल्या असल्या तरी केंद्रात पुढील एनडीए सरकारच्या स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

२०१९ मध्ये याच नितीशकुमार यांनी केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्रिपदाची भाजपची ऑफर नाकारली होती. पुढील वर्षी २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने जदयू राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याची ही संधी सोडणार नाही. केंद्रात एनडीए स्थापन करणार असलेल्या नवीन सरकारमध्ये पक्ष महत्त्वाची मंत्रालये मिळवू शकतो. 

प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलेले आहे की, भविष्यात आपण ‘एनडीए’सोबतच राहणार आहोत. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे तसेच राज्याचे राजकीय हित जपणे त्यांना सोपे जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील त्यांचे मित्रपक्ष बदलण्याच्या वारंवार घेतलेल्या निर्णयांमुळे नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रश्न उपस्थित केले गेले. याशिवाय त्यांच्या प्रकृतीवरूनही त्यांना राजकारणात लक्ष्य करण्यात आले होते.बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार केंद्र सरकारकडे दीर्घकाळापासून करत आहेत. मात्र, केंद्रात गेल्या एक दशकाच्या सत्तेत भाजपला ही मागणी पूर्ण करता आली नाही.  एनडीएचा शक्तिशाली मित्रपक्ष म्हणून त्यांच्या जुन्या मागणीवर ते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे. 

दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मागणार?‘जदयू’मधील सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीशकुमार हे किमान दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. नितीशकुमार यांच्या एनडीएमध्ये परतण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. राज्यात एनडीएचा मित्रपक्ष म्हणून लढलेल्या सर्व १६ जागांवर पक्षाची चांगली कामगिरी झाली आहे. सर्वात मागास जातीच्या मतदारांमध्ये नितीशकुमार यांची लोकप्रियता दिसून आली आहे. 

जदयू म्हणतो, आमच्यामुळे भाजपला फायदा जदयूचे मागास समुदायातील तीन तर भाजपचे मागास समुदायातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. एनडीएमध्ये नितीशकुमार हे अजूनही राज्यातील सर्वात प्रमुख ओबीसी चेहरा आहेत. नितीशकुमार हे एनडीएमध्ये परतल्याने एनडीएला राजकीयदृष्ट्या फायदाच झाल्याचे सिद्ध झाले आहे. जर नितीशकुमार राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसोबत राहिले असते तर बिहारमध्ये भाजपला यश मिळविता आले नसते. भाजपने हे वास्तव स्वीकारावे, असे मत ‘जदयू’च्या सूत्रांनी व्यक्त केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNitish Kumarनितीश कुमार