शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

आधी आशेने पाठिंबा दिला, आता तुमच्या पराभवासाठी झटेन!, तीन वर्षांत घोर निराशा; राम जेठमलानींचे मोदींना रोखठोक पत्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:48 AM

सन २०११ मध्ये भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मीच सर्वात आधी तुमचे नाव सुचविले. ते पचनी न पडल्याने, भाजपाच्या त्या वेळच्या धुरिणांनी माझी पक्षातून बेकायदा हकालपट्टी केली. तरीही तुम्ही पंतप्रधान व्हावे, यासाठी मी झटत राहिलो, पण गेल्या तीन वर्षांच्या अनुभवाने माझी घोर निराशा झाली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या मूर्खपणाची आता मला लाज वाटत आहे.

नवी दिल्ली : सन २०११ मध्ये भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मीच सर्वात आधी तुमचे नाव सुचविले. ते पचनी न पडल्याने, भाजपाच्या त्या वेळच्या धुरिणांनी माझी पक्षातून बेकायदा हकालपट्टी केली. तरीही तुम्ही पंतप्रधान व्हावे, यासाठी मी झटत राहिलो, पण गेल्या तीन वर्षांच्या अनुभवाने माझी घोर निराशा झाली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या मूर्खपणाची आता मला लाज वाटत आहे. त्यामुळे आता २०१९ मध्येच तुमचा लाजिरवाणा पराभव व्हावा, यासाठी चंग बांधण्याचा मी निर्धार केला आहे, असे रोखठोक पत्र ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.फक्त राम जेठमलानीच लिहू शकतात, अशा फर्ड्या इंग्रजीत व अत्यंत कडवट भाषेत. २३ आॅगस्ट रोजी लिहिलेले हे ९ पानी पत्र माध्यमांना उपलब्ध झाले आहे. या पत्राच्या सुरुवातीसच जेठमलानी मोदींना लिहितात की, गेल्या तीन वर्षांत तुम्ही घोर निराशा केली आहे आणि मित्र व नेता म्हणून तुमच्या अपयशाचे अधिकाधिक पुरावे दिवसागणिक समोर येत आहेत. त्यामुळे या अभागी भारतीय राष्ट्राने आपले भाग्य तुमच्या अयोग्य हाती देऊन चूक केली, असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.पुरता भ्रमनिरास झाल्याने, आता तुमच्या पराभवासाठी झटण्याचे मी ठरविले आहेच. त्यासाठी परमेश्वर माझ्या बाजूने असल्याची पूर्ण खात्री बाळगा आणि पुन्हा सत्ता देण्याच्या आणाभाका भोळ््याभाबड्या जनतेला घालून, देशाची पुन्हा एकदा फसवणूक करू नका, असे आवाहनही जेठमलानी यांनी मोदींना केले आहे.जेठमलानी यांनी या पत्रात मोदींच्या कथित अपयशाचा सविस्तर ऊहापोह केला आहे. परदेशातील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनावर मोदींनी सत्ता मिळविली खरी, पण प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले न टाकता, उलट त्यांनी आणि त्यांच्या विश्वासू सहकाºयांनी यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांमध्ये होता होईतो खोडाच घातला, असा आरोप त्यांनी केला आहे.कदाचित सुरुवातीस काळ्या पैशाविषयीची तुमची कळकळ प्रामाणिकही असेल, पण आता माझी खात्री झाली आहे की, मी पंतप्रधान म्हणून तुमचे नाव सुचविले, त्या वेळीही तुम्ही वरकरणी दाखविलेल्या तत्त्वांशी आधीच तडजोड केलेली होती. त्यामुळे तुम्हीही काळ्या पैशाविरुद्ध प्रामाणिकपणे न लढता, तुमच्या काही मित्रांंना व लाभार्थींना वाचवित आहात, या सुबुद्ध आणि चाणाक्ष लोकांच्या संशयास बळ मिळत आहे.पापांचे प्रायश्चित्त घ्यापक्षातून केलेल्या हकालपट्टीच्या बाबतीतही मोदींनी साळसूदपणे अनभिज्ञतेचा बुरखा पांघरला, असाही आरोप जेठमलानी यांनीपत्रात केला आहे. नीतिमत्तेची थोडी जरी चाड असेल, तर मोदींनी या सर्व गोष्टींचा विचार करून, केल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असे भावनिक आवाहनही पत्राच्या शेवटी करण्यात आले आहे.वकिलीतून घेतली निवृत्ती९४ वर्षांच्या जेठमलानी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन वकिली व्यवसायातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे ७० वर्षांपूर्वी चढविलेला वकिलाचा डगला त्यांनी उतरवून ठेवला. मात्र, एक जागरूक नागरिक म्हणून कोणत्याही पक्षाचा मुलाहिजा न ठेवता, भ्रष्टाचार, काळा पैसा व लबाडी याविरुद्ध यापुढेही आपण आवाज उठवतच राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.फसून विश्वास टाकलाजेठमलानी मोदींना लिहितात की, काळ््या पैशाविरुद्ध माझ्या लढ्याचे कौतुक करण्याचे ढोंग तुम्ही केलेत. त्याला फसून मीही तुमच्यावर विश्वास टाकला. खरे तर मी भाजपा सोडून दुसºयांदा बाहेर पडलो होतो, पण मी पुन्हा पक्षात यावे, यासाठी तुम्ही व अमित शहा यांनी मला विनंती केली, पण आता माझ्या लक्षात येते आहे की, अमित शहांना खुनाच्या एका गंभीर खटल्यातून वाचविण्यासाठी मी तुम्हाला हवा होतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा