शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील शिक्षण संस्थेने घेतले एळवण गाव दत्तक

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

अकोला : महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असलेले एळवण हे गाव धैर्यशील शिक्षण संस्थेच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव आदर्श करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.

अकोला : महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असलेले एळवण हे गाव धैर्यशील शिक्षण संस्थेच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव आदर्श करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.
एळवण गावचे गावकरी व धैर्यशील शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गाव आदर्श करण्यात येत आहे. गावाने घेतलेल्या ठरावात राज्य शासनाच्या सर्व योजना गावामध्ये राबविणे, लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे, निर्मलग्राम योजना राबविणे, पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविणे, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान तसेच शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना राबविणे, स्वच्छ व सुंदर अंगणवाडी व शाळा करणे, विविध स्पर्धा घेणे आदींचा समावेश आहे.
एळवण गावाची लोकसंख्या १ हजार एवढी आहे. गावाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. धैर्यशील शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष मंदाताई देशमुख, सरपंच पद्मा टोबरे, उपसरपंच सुनंदा कोरडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नाजुकराव चोरपगार, पोलीस पाटील दुर्गा उइके, माजी पोलीस पाटील, दयाराम कोरडे, श्रीकृष्ण उईके, ग्रा.पं. सदस्य लीलाबाई अडाम आदी उपस्थित होेते.