धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:23 IST2025-04-15T10:23:08+5:302025-04-15T10:23:32+5:30
लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्याच्या सासूसोबत पळून गेला.

धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्हा आजकाल सासू आणि जावयाच्या अनोख्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आहे. या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्याच्या सासूसोबत पळून गेला. पोलिसांनी राहुलच्या मित्रांना ताब्यात घेतलं आहे. राहुल आणि अनिता यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना झालं आहे.
६ एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याआधीही एका महिलेसोबत पळून गेला होता. ती महिला शेजारच्या गावातील होती. दोघेही दोन महिन्यांनी घरी परतले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली नाही, त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. यावेळी राहुल त्याच्या होणार्या सासूसोबत पळून गेला आहे.
राहुल आणि अनिता एकमेकांच्या पडले प्रेमात
जितेंद्र आणि अनिता यांच्या मुलीचं लग्न १६ एप्रिल रोजी राहुलशी होणार होतं. लग्न ठरल्यानंतरच्या तीन महिन्यांतच राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडले. ते तासनतास फोनवर बोलत असत. राहुल आजारी पडला तेव्हा अनिता २५ मार्च रोजी त्याच्या घरी गेली आणि पाच दिवस तिथे राहिली. अनिताच्या मुलीने सांगितलं की, जेव्हा तिने तिच्या आईला राहुलशी तासनतास बोलण्यापासून रोखलं तेव्हा तिची आई अनेक दिवस तिच्याशी बोलली नाही.
तपासासाठी एक पथक गुजरातला
सीओ महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचे काही नातेवाईक हे गुजरातमध्ये राहत आहेत. ज्या दिवशी राहुल त्या महिलेसोबत गेला, त्या दिवशी त्याने त्याच्या नातेवाईकला फोनवर सांगितलं होतं की, तो शेरवानी घेण्यासाठी गुजरातला येत आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तपासासाठी गुजरातला पाठवण्यात आलं आहे. सासरा जितेंद्रने सांगितलं, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला.
"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई
जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."