शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

गोलाणी मार्केटमध्ये मद्यपींचा धुडगूस

By admin | Updated: January 24, 2017 22:03 IST

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या टाक्या व त्यावरील झाकणे फोडण्यात ्रआली आहेत. टोळकेच्या टोळके फिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या टाक्या व त्यावरील झाकणे फोडण्यात ्रआली आहेत. टोळकेच्या टोळके फिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर रहिवाशी भाग आहे तर काही ठिकाणी दुसर्‍या व चौथ्या मजल्यावर नागरिक वास्तव्याला आहेत. या परिसरात पुर्वी रात्री मद्यपींचा धुमाकूळ असायचा आता दिवसाही सुरु झाला आहे. बाहेरुन जेवण व दारुच्या बाटल्या आणून गच्चीवर पाण्याच्या टाकीच्या सावलीचा आसरा घेवून हे टोळके तेथे पार्ट्या करतात. टाकीमधून पाण्याचा वापर करतात तर काही वेळा झाकण उघडले नाही तर ते दगडाने फोडून टाकतात. हा प्रकार अस‘ झाल्याने अनेक जणांनी त्यांना हटकले, मात्र त्यांच्यावरच दादागिरी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
बियरच्या बाटल्यांचा खच
गच्चीवर देशी,विदेशी व बियरच्या बाटल्यांचा मोठा साठा तयार झाला आहे. आपसातील भांडणामुळे बाटल्या फोडल्या जातात. रात्री तर जोरजोराने आरडाओरड व अश्लिल शिवीगाळ केली जातेे. काही जण तर मुली व महिलांना सोबत आणून कोपर्‍यात अश्लिल चाळे करतात, या प्रकारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पोलिसांकडे तक्रार करुनही त्याचा फारसा उपयोग होत नाही.
गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांचाच समावेश
मार्केटमध्ये मोकळ्या जागेत तसेच गच्चीवर पार्ट्या करुन धिंगाणा घालणार्‍या या तरुणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. चोर्‍या चपाट्या करुन आलेल्या पैशाची येथे उधळप˜ी केली जाते. यातील काही तरुण पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. रेल्वे स्टेशन, गोलाणी मार्केट, बी.जे.मार्केट ही त्यांची ठिकाण असल्याचे रहिवाशांनी सांगितले. पोलिसांनी या परिसरात रात्रंदिवस गस्त करावी अशी मागणी केली जात आहे.