शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या विमान अपघाताला दोन महिने, DGCA कडून नवे नियम जारी;... तर पायलट जबाबदार राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:10 IST

Ajit Pawar Plane Crash Baramati: अजित पवार विमान अपघात अपडेट: DGCA चे व्हीआयपी हालचालींसाठी नवे नियम. रोहित पवार यांची बंगळुरूमध्ये झिरो एफआयआर. ५ गंभीर आरोपांमुळे खळबळ.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या अपघाताच्या चौकशीत आणि कायदेशीर प्रक्रियेत दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत.

अपघाताचे मुख्य कारण वैमानिकांवरील दबाव असू शकते, हे लक्षात घेऊन DGCA ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. व्हीआयपी किंवा नेत्यांनी उड्डाणादरम्यान किंवा हवामान खराब असताना वैमानिकावर कोणताही दबाव टाकू नये. प्रवासाच्या नियोजनात शेवटच्या क्षणी बदल करायचा असल्यास तो थेट वैमानिकाला न सांगता ऑपरेटर मॅनेजमेंटमार्फतच करावा लागेल. हवामान किंवा तांत्रिक कारणास्तव वैमानिकाने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सन्मान करावा लागेल. आता वैमानिक थेट नकार देऊ शकतात आणि त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.

रोहित पवार यांची 'झिरो एफआयआर' आणि ५ गंभीर आरोप:अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या अपघाताला 'गुन्हेगारी कट' संबोधत बंगळुरूमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी उपस्थित केलेले ५ संशयास्पद मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • लॉग बुकमध्ये फेरफार: विमानाचे अधिकृत उड्डाण ४,९१५ तास असताना प्रत्यक्षात ते ८,००० तासांपेक्षा जास्त उडवल्याचा दावा.
  • हवामानाचे उल्लंघन: कमी दृश्यमानता (Low Visibility) असतानाही लँडिंगची परवानगी दिली गेली.
  • वैमानिक बदल: शेवटच्या क्षणी क्रू बदलून सुमित कपूर यांना वैमानिक म्हणून सामील केले गेले.
  • विमा पॉलिसी: अपघाताच्या काही काळ आधीच वैमानिक सुमित कपूर यांच्या नावे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आली होती.
  • वैमानिकाची पार्श्वभूमी: वैमानिक सुमित कपूर यापूर्वी मद्यप्राशन प्रकरणांमुळे निलंबित झाले होते. 

अपघाताचा 'प्राथमिक अहवाल'एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोने २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमानाने लँडिंगपूर्वी उजवीकडे वळण घेतले, ते झाडांना धडकले आणि त्यानंतर जमिनीवर आदळले, असे यात म्हचले होते. जमिनीवर आदळताच विमानाने पेट घेतला, ज्यामुळे कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. अपघाताच्या एक दिवस आधी करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत विमानात कोणतीही त्रुटी आढळली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : DGCA Issues New Rules After Ajit Pawar's Plane Crash

Web Summary : Following Ajit Pawar's plane crash, DGCA's new guidelines protect pilots from VIP pressure. Rohit Pawar alleges criminal conspiracy, citing logbook tampering and policy irregularities. Initial report reveals plane hit trees before crash.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाRohit Pawarरोहित पवार