शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलचा तो दावा खोटा - जिओ

By admin | Updated: March 21, 2017 19:43 IST

अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर इतर कंपनींने धसका घेतला आहे. मात्र पहिल्यांदाच जिओने एअरटेलविरूद्ध तक्रार केलीय.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर इतर कंपनींने धसका घेतला आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकत्र येत आहेत, तसेच जिओच्या स्वस्त कॉलिंग आणि डेटा प्लॅनविरोधत प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तक्रारारीही दाखल केल्या होत्या. मात्र पहिल्यांदाच जिओने एअरटेलविरूद्ध तक्रार केलीय. जिओने तक्रारीत म्हटलं आहे एअरटेलने इंटरनेटचा वेग सर्वाधिक असल्याचा दावा केलाय जो सपशेल खोटा आहे.एअरटेलने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की 40 दशलक्ष चाचण्यांनंतर ओकलाने एअरटेलचा वेग सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. ओकला एक अ‍ॅप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत इंटरनेटचा वेग किती आहे ते तपासता येतं. जिओने आरोप केलाय की ओकला ही कोणतीही सरकारी संस्था नाहीये ती खाजगी कंपनी आहे आणि हे सगळं एअरटेल आणि ओकलाचं संगनमत आहे. जिओचा आरोप आहे की ओकला ही कंपनी वेग जास्त आहे असं सांगण्यासाठी पैसे घेते. त्यामुळे एअरटेलच्या जाहिरातींवर निर्बंध आणावेत.