नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी आज नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. लढाऊ विभागात ६ डिसेंबर १९८६ रोजी दाखल झालेले रानडे यांनी लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि २ हवाई स्थानकांचे कमांडर यासह विविध जबाबदारी पार पाडली आहे. नियुक्तीपूर्वी ते मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. रानडे यांना २००६ साली वायू सेना (शौर्य) पदक आणि वर्ष २०२० साली अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
हवाई दलात महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे रुजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:03 IST