शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या पायलटने 2 तास वाट पाहायला लावली, पीडितेच्या सहप्रवाशाने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 20:20 IST

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-नवी दिल्ली फ्लाइटमधील लघुशंका घटनेबाबत आता अनेक नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्या दिवशी फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाने एअर इंडियाकडे लेखी तक्रार केली आहे.

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-नवी दिल्ली फ्लाइटमधील लघुशंका घटनेबाबत आता अनेक नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्या दिवशी फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाने एअर इंडियाकडे लेखी तक्रार केली आहे. यामध्ये विमान कंपन्यांचे पायलट आणि इतर क्रू मेंबर्सच्या वागणुकीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 'पायलटने पीडितेला कराब सीटवर परत जाण्यास भाग पाडले, तर नवीन सीट देण्यासाठी  2 तास थांबायला लावले, असा दावा  सहप्रवाशाचा केला आहे. 

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शंकर मिश्रा ज्या कंपनीत काम करत होते, त्या कंपनीतून त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

फ्लाईटमध्ये प्रवास करत असलेल्या डॉ. सौगता भट्टाचार्जी या अन्य एका प्रवाशाने तक्रार केली आहे. 'दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये  आरोपीच्या शेजारी असलेल्या सीटवर बसले होते. फर्स्ट क्लासमध्ये 4 जागा रिकाम्या असूनही पीडित प्रवाशाला खराब सीटवर परत जायला सांगितले. बिझनेस क्लासमधील पहिल्या रांगेतील सीट 8A वर आरोपी शंकर मिश्रा यांच्या शेजारी ते बसले होते आणि मिश्रा सीट 8C वर होत्या, असं तक्रारीत म्हटले आहे.

न्यूयॉर्क ते नवी दिल्ली या फ्लाइट एआय 102 मध्ये दुपारचे जेवण देण्यात आले होते. यानंतर लाईट बंद करण्यात आली. बिझनेस क्लासमधील सीट 8C वर बसलेला प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. तो थोडावेळ उठला आणि वृद्ध महिलेच्या सीटवर गेला (9A), आणि त्याने लघुशंका केली.

'जेव्हा शंकर मिश्रा पडले तेव्हा जागे झालो.  सुरुवातीला त्याला वाटले की, फ्लाइटमध्ये असल्यामुळे त्याचा तोल गेला असावा. मात्र, तो टॉयलेटला जात असताना त्याला 9A आणि 9C या सीटवर दोन सहप्रवासी बसलेले दिसले. यामध्ये सीट 9 ए वर बसलेली महिला गॅलरीत आल्या.

सहप्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे कळताच धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना धक्काच बसला की तो इतका नशेत होता की त्याने पुढच्या रांगेत बसलेल्या प्रवाशावर लघुशंका केली. यादरम्यान दोन एअर होस्टेसनी स्वच्छ केले.कपडे बदलण्यात आणि त्याचे सामान आणि सीट साफ करण्यात मदत केली, असंही पुढ म्हटले आहे. 

फ्लाइटच्या कॅप्टनने महिलेला नवीन सीट देण्यासाठी त्यांना 2 तास थांबायला लावल्यामुळे त्यांना अधिक त्रास झाला होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, बिझनेस क्लासमध्ये जागा रिकाम्या नसल्यामुळे तिला 20 मिनिटे उभे करण्यात आले आणि एअरलाइनच्या कर्मचार्‍यांनी वापरलेली छोटी सीट दिली.

दिल्लीत तरुणीला फरफटत नेल्याच्या प्रकरणात नवा खुलासा, मृत तरुणीच्या मैत्रिणीचा गांजाचा धंदा, झाली होती अटक!

पीडितेच्या तक्रारीनुसार, ती एका छोट्या सीटवर सुमारे दोन तास बसून राहिली आणि तिला ओल्या आणि लघुशंका केलेल्या ठिकाणी परत जाण्यास सांगितले. सौगता भट्टाचार्जी यांनी केबिन क्रूच्या दोन सदस्यांचे कौतुक केले ज्यांनी महिलेला साफसफाईमध्ये मदत केली.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया