Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:48 IST2025-06-26T14:28:36+5:302025-06-26T14:48:11+5:30

Black Box Data Recover of Air India Plane Crash: विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर आहेत.

Air India Plane Crash: Success in black box investigation, data downloaded; When will the cause of the accident be revealed? | Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

Ahmedabad Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानअपघातामुळे अवघ्या देशाला हादरा बसला होता. या भीषण अपघातातविमानातील प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एका प्रवाशाला या अपघातातून आपला जीव वाचवता आला आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

ब्लॅक बॉक्सचा तपास कुठवर आला?
अहमदाबाद विमान अपघातातील विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटाचा तपास अद्याप सुरू आहे. सध्या, सीव्हीआर आणि एफडीआर डेटाचे विश्लेषण केले जात आहे. अपघाताचे कारण शोधणे आणि विमान वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी, तसेच भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी योगदान देणारे घटक ओळखणे हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट असल्याचे, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. 

'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम.

विमानाचा भीषण अपघात!
१२ जून रोजी लंडनकडे जाणारे बोइंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले. ते थेट विमानतळाच्या अगदी बाहेर असलेल्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या निवासी कॅम्पसमध्ये पडले. एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे. 

Web Title: Air India Plane Crash: Success in black box investigation, data downloaded; When will the cause of the accident be revealed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.