Air India Plane Crash : 'वैमानिकांना दोष देऊन मोठ्या विमान कंपन्यांना वाचवलं जातंय...', एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:09 IST2025-07-12T13:59:37+5:302025-07-12T14:09:23+5:30
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला.

Air India Plane Crash : 'वैमानिकांना दोष देऊन मोठ्या विमान कंपन्यांना वाचवलं जातंय...', एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न
Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्याविमानाचा १२ जून रोजी अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवालात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
अहवालानुसार, विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडल्याने हा अपघात झाला. इंधन कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वेळेअभावी वैमानिकांना परिस्थिती सुधारण्याची संधी मिळाली नाही.
यासोबतच कॉकपिटमधील दोन्ही वैमानिकांमधील संभाषणाचे रेकॉर्डिंगही समोर आले आहे, त्यानुसार वैमानिक सुमित सभरवाल यांनी सह-वैमानिकाला विचारले होते की, तुम्ही इंधन स्विच का बंद केला?
यावर उत्तर देताना, सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांनी उत्तर दिले की त्यांनी बंद केले नव्हते. काँग्रेसने आता प्राथमिक तपास अहवालाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आरोपही केले आहेत.
काँग्रेस नेत्याचा आरोप
दरम्यान, आता यावरुन काँग्रेसने आरोप केले आहेत. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी आरोप केला की, बहुराष्ट्रीय कंपन्यांना संरक्षण दिले जात आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांना दोषी ठरवले जात आहे.
VIDEO | “Multinational companies being saved, blame being pinned on the people (pilots) who died,” says Congress leader Surendra Rajput on the preliminary report by the Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) on Air India flight 171 crash.
— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2025
(Full video available on PTI… pic.twitter.com/Qp4JHDziuF
दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात १२ जून २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. या विमान अपघाताच्या प्रकरणात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा अहवाल आला आहे. या अहवालात विमान अपघाताबाबत उड्डाणात काय घडत होते याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक इंजिन सुरू झाले. पण इंजिन २ सुरू झाले नाही.
वैमानिकांनी 'मेडे' कॉल देण्याच्या काही सेकंद आधी विमान वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, "मेडे" कॉलच्या फक्त १३ सेकंद आधी, वैमानिकांनी इंजिन इंधन नियंत्रण स्विच "कटऑफ" वरून "रन" वर परत केला, म्हणजेच इंजिन रीस्टार्ट प्रक्रिया सुरू केली. दुपारी १:३८:५२ वाजता, इंजिन १ चा इंधन स्विच "रन" वर आणला. दुपारी १:३८:५४ वाजता, APU इनलेट दरवाजा उघडण्यास सुरुवात झाली, यामुळे इंजिन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी १:३८:५६ वाजता, इंजिन २ देखील "रन" वर स्विच करण्यात आले. या प्रक्रियेत, FADEC सिस्टम स्वयंचलितपणे इंधन आणि इग्निशनचे नियंत्रण घेते. दोन्ही इंजिनमध्ये EGT मध्ये तीव्र वाढ दिसून आली - ही रिलाईट दाखवते.