दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:02 IST2025-07-22T19:02:38+5:302025-07-22T19:02:58+5:30
हाँगकाँगवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली.

दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
Air India: एअर इंडियाच्याविमानातआग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानात ही आग लागली. हे विमान हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने येत होते. विमानतळावर उतरताच विमानाच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागली. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
Flight AI 315, operating from Hong Kong to Delhi on 22 July 2025, experienced an auxiliary power unit (APU) fire shortly after it had landed and parked at the gate. The incident occurred while passengers had begun disembarking, and the APU was automatically shut down as per… pic.twitter.com/j32CC7P3Zk
— ANI (@ANI) July 22, 2025
याबाबत अधिक माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणारी फ्लाइट क्रमांक एआय ३१५ लँड झाल्यानंतर प्रवासी खाली उतरत होते. यावेळी अचानक ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. या आगीमुळे विमानाचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. आता या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल.
APU म्हणजे काय ते जाणून घ्या?
APU म्हणजेच ऑक्झिलरी पॉवर युनिट हे एक लहान गॅस टर्बाइन इंजिन असते. हे विमानाच्या शेपटीत बसवलेले असते. ऑक्झिलरी पॉवर युनिट विमान उभे असताना वीज पुरवठा आणि एअर कंडिशनिंग सारखी कामे करते. हे उड्डाणादरम्यान मुख्य इंजिनचे काम करत नाही, परंतु विमानाच्या पार्किंग दरम्यान आवश्यक असते.