Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:00 IST2025-06-14T19:58:35+5:302025-06-14T20:00:00+5:30

Ahmedabad Plane Crash : सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर रडताना दिसत असून तो त्याची व्यथा मांडत आहे. 

ahmedabad plane crash doctor cried and asked for more time after order to vacate the hostel video viral | Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश दुःखी आहे. ही दुर्घटना इतकी भयानक होती की लोकांचे मृतदेह ओळखणं देखील कठीण झालं आहे. अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील चार इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर रडताना दिसत असून तो त्याची व्यथा मांडत आहे. 

अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून १३ जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत डॉक्टरांचं हॉस्टेल रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. येथे राहणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. काही डॉक्टरांची घरं जळून खाक झाली आहेत. या आदेशानंतर डॉ. अनिल यांनी आणखी काही वेळ देण्याची विनंती केली आहे.

कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

"रातोरात घर रिकामं करणं इतकं सोपं नाही"

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, डॉ. अनिल हे पूर्णपणे खचले आहेत. ते रडत आहेत आणि माध्यमांसमोर म्हणत आहेत की, "रातोरात घर रिकामं करणं इतकं सोपं नाही. आम्हाला आणखी दोन-तीन दिवस वेळ द्यावा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझी मुलगी आणि मे़ड रुग्णालयात दाखल आहेत, मी यावेळी तिथे असायला हवं."

"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव

हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

"थोडी माणुसकी दाखवा"

"मला घर रिकामं करण्यासाठी वेळ द्या, हा मेसेज वरपर्यंत पाठवा, थोडी माणुसकी दाखवा, मी गुजरातचा नाही, मी असहाय्य आहे, माझी काही चूक नाही, मी आणि माझी पत्नी अपघात झाला तेव्हा रुग्णालयात काम करत होतो, आम्ही चार वर्षांपासून येथे राहत आहोत. प्लीज, आम्हाला मदत करा." डॉ. अनिल यांचा हा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा आहे. 
 

Web Title: ahmedabad plane crash doctor cried and asked for more time after order to vacate the hostel video viral