अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:51 IST2025-06-12T15:47:58+5:302025-06-12T15:51:01+5:30

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील होते.

Ahmedabad Plane Crash: Ahmedabad plane crash: Passenger list revealed, former Gujarat Chief Minister Vijay Rupani's name also... | अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव

अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव

Ahmedabad Plane Crash: भारतासाठी आज काळा दिवस ठरला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. या भीषण अपघातातविमानातील 242 प्रवासी आणि 13 क्रु मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात विमानाची राखरांगोळी झाल्याचे दृष्य पाहायला मिळतेय.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. दरम्यान, अपघातानंतर सोशल मीडियावर प्रवाशांची यादी व्हायरल होत आहे. यात रुपाणी यांचेही नाव दिसत आहे. सध्या परिसरात बचावकार्य राबवले जात आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य ते निर्देश दिले आहेत.

पाहा प्रवाशांची संपूर्ण यादी

एअर इंडियाने दिली अपघाताबाबत महत्त्वाची माहिती
एअर इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, अहमदाबाद-लंडन गॅटविक ही विमान उड्डाण घेतल्यानंतर फ्लाइट AI171 चा 12 जून 2025 रोजी अपघात झाला आणि मोठी दुर्घटना झाली. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

Web Title: Ahmedabad Plane Crash: Ahmedabad plane crash: Passenger list revealed, former Gujarat Chief Minister Vijay Rupani's name also...