Ahmedabad Plane Crash: मोठ्या मनाचा माणूस! विमान अपघातस्थळी सापडलेलं ७० तोळं सोनं केलं परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:49 IST2025-06-19T14:41:32+5:302025-06-19T14:49:17+5:30
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली.

Ahmedabad Plane Crash: मोठ्या मनाचा माणूस! विमान अपघातस्थळी सापडलेलं ७० तोळं सोनं केलं परत
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मदतीसाठी सर्वात आधी धावलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या राजेश पटेल यांनी बचावकार्य पूर्ण केल्यानंतर अपघातस्थळी परत जात तेथे पडलेले सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम, मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि त्या पोलिसांकडे सुपूर्द केल्या. पटेल यांनी सांगितले की, १० ते १५ हँडबॅगमधून ७० तोळे सोन्याचे दागिने, ८-१० चांदीच्या वस्तू, पासपोर्ट, ५० हजार रोख व २० डॉलर मिळाले.
२०८ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविली
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील २०८ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्यात आली. त्यापैकी १७० जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेली एकमेव व्यक्ती विश्वासकुमार रमेश यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घरी जाण्यास मंगळवारी परवानगी दिली. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली व त्यातील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले होते.