शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस कमी पडताच, कर्नाटक-तामिळनाडूत सुरू होते भांडण

By admin | Updated: September 12, 2016 01:18 IST

मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात चांगला हजेरी लावतो तेव्हा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत कावेरीच्या पाणी वाटपावरून चकार शब्दानेही वाद समोर येत नाही.

बंगळुरू : मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात चांगला हजेरी लावतो तेव्हा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत कावेरीच्या पाणी वाटपावरून चकार शब्दानेही वाद समोर येत नाही. परंतु जेव्हा कावेरीच्या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडतो व कावेरीच्या खोऱ्यातील चार महत्त्वाच्या जलाशयांमध्ये त्यांच्या धरण क्षमतेपेक्षाही कमी पाणी असते त्यावेळी मात्र ही दोन राज्ये पाणी वाटपावरून एकमेकांशी भांडतात.

यावर्षी दक्षिण कर्नाटकच्या अनेक भागांत पाऊस साधारण प्रमाणापेक्षा ४० टक्के जास्त झाला. तथापि, कावेरी नदीच्या कोदगु जिल्ह्यातील मुख्य धरणक्षेत्रात तो सामान्य प्रमाणाच्याही ३३ टक्के कमीच झाला. पर्यायाने कावेरी नदी खोऱ्याच्या कर्नाटकातील कृष्णराज सागर, हरंगी, हेमवती आणि काबिनी जलाशयात पाणी कमी आले. आज त्यांच्यातील सगळे पाणी आॅगस्टअखेर केवळ ११४.६६ हजार दशलक्ष क्युबिक फूट आहे. त्यांच्यात ते सामान्यत: २१५.७० टीएमसी फूट असते. कर्नाटकातील या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने आपल्या राज्याच्या तंजावूर भागातील शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आॅगस्टमध्ये कर्नाटकविरोधात तक्रार केली. पाच फेबु्रवारी २००५ रोजी कावेरी जल विवाद लवादाने सामान्य पाऊस झाल्यानंतर पाणी सोडण्याची योजना काय असावी याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन कर्नाटकने केले नाही अशी तमिळनाडूची तक्रार होती.

तंजावूर भागातील सांबामध्ये आॅगस्ट ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. पाच सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला त्याने देखरेख ठेवणाऱ्या समितीकडे दाद मागण्याचा आदेश दिला. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यावर कावेरीच्या पाणी वाटपाचा निर्माण होणारा वाद कसा सोडवायचा यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हा आदेश देताना न्यायालयाने शेतकऱ्यांचे पाण्यावाचून होणारे हाल बघता दहा दिवसांसाठी कर्नाटकने रोज १५ हजार क्युसेक पाणी तमिळनाडूला सोडावे असा हंगामी आदेश दिला. त्यामुळे पुन्हा संघर्ष सुरू झाला. (वृत्तसंस्था)कर्नाटकची सर्वोच्च न्यायालयात याचिकानवी दिल्ली : कावेरी नदीतून तामिळनाडूला दररोज १५ हजार क्युसेक्सऐवजी एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्याची परवानगी मागणारी याचिकी शनिवारी सायंकाळी कर्नाटकन सर्वोच्च न्यायालयात केली. तिच्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कर्नाटकने तामिळनाडूला दररोज १५ हजार क्युसेक्स पाणी दहा दिवस कावेरी नदीतून सोडावे, या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा करण्याचीही विनंती कर्नाटकने या याचिकेत केली आहे. तामिळनाडूला पाणी सोडावे लागत असल्यामुळे राज्यात आंदोलन सुरू झाले असून, त्यात राज्याचे दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.