एलपीजीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचाही तुटवडा? महानगर गॅसनं दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 20:18 IST2026-03-11T20:17:21+5:302026-03-11T20:18:30+5:30

Mumbai PNG and CNG Supply: मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली.

After LPG, is there a shortage of CNG and PNG too? Mahanagar Gas gave very important information | एलपीजीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचाही तुटवडा? महानगर गॅसनं दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

एलपीजीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचाही तुटवडा? महानगर गॅसनं दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या बातम्या समोर येत असतानाच, हानगर गॅस लिमिटेडने पीएनजी आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजी पुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.

मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम व्यावसायिक गॅसवर झाला असला, तरी महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कार्यक्षेत्रात सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा पूर्णपणे सामान्य राहील. गॅस पुरवठ्यात कोणताही खंड पडलेला नाही आणि भविष्यातही तो अखंड सुरू राहील, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे.

अनेक ग्राहकांना भीती होती की, मध्य पूर्वेतील संकटामुळे सीएनजी-पीएनजीचे दर वाढतील किंवा पुरवठा थांबेल. मात्र, एमजीएलच्या स्पष्ट केले आहे की, घरगुती पीएनजीची १०० टक्के मागणी ही भारतात उत्पादित होणाऱ्या गॅसद्वारे पूर्ण केली जाते. घरगुती वापरासाठी लागणारा गॅस देशांतर्गत उपलब्ध असल्याने जागतिक युद्धाचा किंवा सागरी व्यापार मार्गांतील अडथळ्यांचा यावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. तसेच महानगर गॅसने ग्राहकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील सीएनजी पंप आणि घरगुती पीएनजी कनेक्शन सुरक्षित आहेत.

दुसरीकडे, मध्य पूर्वेतील सागरी व्यापार मार्गांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे आयात केल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांतील हॉटेल व्यावसायिकांकडे व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक मोठ्या हॉटेल व्यावसायिकांवर चुल पेटवण्याची वेळ आली आहे. 

Web Title : सीएनजी, पीएनजी की कमी नहीं: महानगर गैस ने आपूर्ति स्थिर रहने का आश्वासन दिया

Web Summary : महानगर गैस ने आश्वासन दिया कि मध्य पूर्व में तनाव के कारण एलपीजी प्रभावित होने के बावजूद सीएनजी और पीएनजी की आपूर्ति सामान्य रहेगी। घरेलू गैस उत्पादन निर्बाध पीएनजी आपूर्ति सुनिश्चित करता है। घबराने की जरूरत नहीं; मुंबई और आसपास के क्षेत्रों में आपूर्ति सुरक्षित है।

Web Title : No CNG, PNG Shortage: Mahanagar Gas Assures Stable Supply Amid Turmoil

Web Summary : Mahanagar Gas assures that CNG and PNG supply will remain normal despite Middle East tensions impacting LPG. Domestic gas production ensures uninterrupted PNG supply. No need to panic; supplies in Mumbai and surrounding areas are secure, despite LPG shortages elsewhere.