शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

पाक हेराच्या अटकेनंतर दक्षिणेत चोख सुरक्षा

By admin | Updated: September 15, 2014 03:02 IST

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करण्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या आणखी एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करण्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या आणखी एका नागरिकाला अटक झाल्यानंतर केंद्रीय सुरक्षा संस्थानी देशातील दक्षिणेकडील राज्यातील संरक्षण आणि परदेशी महावाणिज्य दूतावास यासह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची निगराणी वाढविली आहे.राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये अरुण सेल्वराजन यास अटक केली होती. त्याच्याकडून तटरक्षक दल परिसरासारख्या संरक्षण प्रतिष्ठानांचे नकाशे आणि काही संवेदनशील दस्ताऐवज हस्तगत केले होते. राजनैतिकदृष्टीने महत्त्वाच्या काही ठिकाणांची माहिती कोलंबो येथील आयएसआयशी संबंधित लोकांना दिली, असे सेल्वराजन याने प्राथमिक चौकशीत सांगितले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सेल्वराजन हा लिट्टे या दहशतवादी गटाचा समर्थक असल्याने श्रीलंकेत ‘वॉन्टेड’ आहे. एनआयए चेन्नई येथील एका न्यायालयाकडे अर्ज केला असून, सेल्वराजन याला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून काही आणखी गुप्तहेर दक्षिणेत सक्रिय तर नाहीत ना हे बघण्यासाठी अनेक ठिकाणांची निगराणी वाढविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही काळासाठी कोलंबो येथील पाक उच्चायुक्तामध्ये व्हिसा कौन्सिलर म्हणून काम करीत असलेला आमिर जुबेर सिद्दीकी याला इस्लामाबादला परत पाठविले होते. तो भारताविरुद्ध कारवाया करीत होता. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर यासाठी दबाव आणला होता. सिद्दीकी श्रीलंकेतील आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर परत आल्याचे वृत्त श्रीलंकेतील काही वृत्तपत्रांनी कोलंबोतील पाकिस्तानी प्रेस अताशे दाऊद एहतेशामच्या हवाल्याने दिले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)