शंकराचार्यांवर अटकेची टांगती तलवार, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; पोलीस करताहेत तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 08:34 IST2026-02-25T08:24:31+5:302026-02-25T08:34:49+5:30

पोलिसांचा तपास आता तांत्रिक पुराव्यांपुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीदारही गोळा करण्यात येत आहेत.

After a case was registered under POCSO, Swami Avimukteshwaranand applied for anticipatory bail in the High Court at Prayagraj | शंकराचार्यांवर अटकेची टांगती तलवार, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; पोलीस करताहेत तपास

शंकराचार्यांवर अटकेची टांगती तलवार, अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; पोलीस करताहेत तपास

प्रयागराज - शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात प्रयागराजच्या झूंसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तर दुसऱ्या पीडितेचा जबाब आणि पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. माघ मेळ्यातील कथित घटनास्थळाचे पुन्हा तपासणी केली जात आहे. त्याठिकाणच्या हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजही पडताळले जाणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

हा गुन्हा अविमुक्तेश्वरानंद, त्यांचे शिष्य मुकुंदानंद ब्रह्मचारी आणि ३ अज्ञातांविरोधात दाखल आहे. तक्रारकर्ते आशुतोष ब्रह्मचारी यांनी कोर्टात २ अल्पवयीन मुलींचे जबाब सादर केले होते. ज्याच्या आधारे  पोक्सोच्या विशेष कोर्टाच्या आदेशावर झूंसी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मेडिकल रिपोर्ट आणि आधीचे जबाब हे जुळवून पाहिले जात आहेत. त्याशिवाय मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन डेटा आणि मेळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही शोधले जात आहेत. कथित घटनेच्या वेळी संबंधित लोक कुठल्या स्थानी होते याचाही तपास पोलीस करत आहेत.

साधू संत आणि प्रत्यक्षदर्शींची होणार चौकशी

पोलिसांचा तपास आता तांत्रिक पुराव्यांपुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीदारही गोळा करण्यात येत आहेत. तपास पथकाने ज्या छावणीच्या परिसरात कथित घटना झाल्याचे मानले जाते त्या ठिकाणाचा नकाशा तयार केला आहे. पोलीस आता जवळच्या छावण्यांचे संचालक, तेथे तैनात सुरक्षा कर्मचारी आणि नियमितपणे भेट देणाऱ्या साधू संतांची चौकशी करण्याची तयारी करत आहेत. त्या विशिष्ट काळात तेथे अल्पवयीन मुले आढळली का आणि आजूबाजूच्या लोकांना कोणतीही संशयास्पद हालचाल लक्षात आली का हे शोधण्याकडे पोलिसांचा कल आहे. भविष्यात कोणत्याही पक्षाकडून छेडछाड किंवा पक्षपातीपणाचे आरोप रोखण्यासाठी तपासाच्या प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी अविमुक्तेश्वरानंद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्यावर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. आशुतोष ब्रह्मचारी यांच्या अर्जानंतर प्रयागराजमध्ये नियुक्त केलेल्या पोक्सो कायद्याच्या विशेष न्यायाधीशांच्या आदेशानंतर झूंसी पोलिस ठाण्यात रविवारी पोक्सो कायदा आणि बीएनएस कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यात  अविमुक्तेश्वरानंद यांच्या अटकेची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. खटला दाखल झाल्यानंतर झूंसी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आता हायकोर्टात काय होते हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तरी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Web Title : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पर पोक्सो का मामला, गिरफ्तारी की तलवार लटकी।

Web Summary : प्रयागराज में शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद के खिलाफ पोक्सो मामला दर्ज, पुलिस जांच कर रही है। मेडिकल रिपोर्ट और सीसीटीवी फुटेज सहित सबूत जुटाए जा रहे हैं। गिरफ्तारी की आशंका के बीच उन्होंने अग्रिम जमानत याचिका दायर की।

Web Title : Shankaracharya Avimukteshwaranand faces arrest over POCSO case; police investigate.

Web Summary : Shankaracharya Avimukteshwaranand is under investigation in a POCSO case filed in Prayagraj. Police are gathering evidence, including medical reports and CCTV footage. Arrest looms as he seeks anticipatory bail.