१५ वर्षांपासूनचं अफेअर, पती ठरत होता अडथळा, अखेर पत्नीने प्रियकरासोबत मिळून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:12 IST2023-09-08T17:11:40+5:302023-09-08T17:12:12+5:30
Crime News: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.

१५ वर्षांपासूनचं अफेअर, पती ठरत होता अडथळा, अखेर पत्नीने प्रियकरासोबत मिळून...
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या पत्नीने पतीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. तसेच अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने प्रियकारसोबत मिळून पतीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी ही महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचा प्रियकर हा तिच्या नणंदेचा पती आहे. या दोघांमध्ये सुमारे १५ वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते.
भरतपूर जिल्ह्यातील नदबई ठाणे क्षेत्रातील भदीरा गावमध्ये अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांना सूत्रे हलवताना आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मृत तरुणाच्या पत्नीचं नाव शीला जाटव, तर तिच्या प्रियकराचं नाव राधेश्याम जाटव असं आहे.
आरोपी महिलेचे गेल्या १५ वर्षांपासून तिच्या नणंदेच्या पतीसोबत अफेअर सुरू होतं. या दोघांमधील अनैतिक संबंधांची माहिती महिलेच्या पतीला मिळाली होती. त्यामुळे तो मद्यधुंद अवस्थेत या महिलेला मारहाण करत असे. त्यामुळे त्रस्त होऊन आरोपी महिलेने पतीच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली.
२७ ऑगस्टच्या रात्री या महिलेने तिच्या नणंदेच्या पतीला घरी बोलावले. तिथे रात्री उशिरा या दोघांनी मिळून या महिलेच्या पतीची गळा आवळून हत्या केली. या घटनेबाबत मृत तरुणाच्या मुलाने हत्येची शंका वर्तवून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून महिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला.