आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण...

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 03:18 PM2020-09-26T15:18:18+5:302020-09-26T15:20:16+5:30

'वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ' च्या म्हणण्यानुसार, एएसएफ हा एक व्हायरल आजार आहे, जो पाळीव आणि वन्य डुक्करांवर परिणाम करतो.

African Swine Fever Hits Assam Piggery Sector, Government Orders Culling Of 12000 Pigs | आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण...

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण...

Next
ठळक मुद्देहा आजार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरत नाही.दूषित चारा आणि शूज, कपडे, वाहने, चाकू यासारख्या वस्तूंद्वारेही याचा प्रसार होऊ शकतोदुर्गा पूजा उत्सवापूर्वी १२ हजार संक्रमित डुकरांना ठार मारण्याचे आदेश

गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत आफ्रिकन स्वाईन फिव्हरने(एएसएफ ) प्रभावित झालेल्या भागामधील १२ हजार डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. कोविड -१९ लॉकडाऊनमुळे आसामच्या पोल्ट्री क्षेत्रात आधीच परिणाम झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच वेळी, आता आफ्रिकन स्वाइन तापमुळे राज्यात १८ हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. पहिला एएसएफ प्रकरण मे महिन्यात समोर आलं होतं.

डुक्कर फार्मच्या मालकांचं म्हणणं आहे की, सरकारची आकडेवारी चुकीची आहे, कारण या रोगामुळे १ लाखाहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. आजारावर कोणतीही लस नाही आणि त्याचा मृत्यू दर ९० ते १०० टक्के आहे. सरकारकडून मदत किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. 'वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ' च्या म्हणण्यानुसार, एएसएफ हा एक व्हायरल आजार आहे, जो पाळीव आणि वन्य डुक्करांवर परिणाम करतो. हा आजार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरत नाही. दूषित चारा आणि शूज, कपडे, वाहने, चाकू यासारख्या वस्तूंद्वारेही याचा प्रसार होऊ शकतो.

पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त सचिव श्याम जगन्नाथन यांनी मे महिन्यापासून केलेल्या अंदाजांचा हवाला देत सांगितलं की, सुमारे १८ हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. सोनोवाल यांनी दुर्गा पूजा उत्सवापूर्वी १२ हजार संक्रमित डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. प्रोटोकॉलनुसार मृत डुकरांच्या नमुन्यांची तपासणी एका भागात केली जाईल आणि एएसएफची लागण झाल्याची खात्री झाल्यास त्याभोवती सुमारे एक किमी एपिकेंटर(उपकेंद्र) परिसर म्हणून घोषित केला जाईल. मग त्या भागातील सर्व डुकरांना शिक्का मारून ठार मारण्यात येईल.

केंद्राच्या बाहेरील १ किमी क्षेत्राला सर्विलांस झोन आणि त्यानंतर ९ किमीचा बफर झोन असे म्हणतात. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३३ एपिकेंटर आहेत. शेजारच्या राज्यांमधून आसाममध्ये होणाऱ्या डुकरांच्या आयातीवर बंदी घातली आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार आसाममध्ये डुक्करांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात सुमारे २१ लाख डुक्कर आहेत.

Web Title: African Swine Fever Hits Assam Piggery Sector, Government Orders Culling Of 12000 Pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.