आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य : पिचड

By admin | Published: February 14, 2015 01:07 AM2015-02-14T01:07:10+5:302015-02-14T01:07:10+5:30

आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य : पिचड

Adivasis want independent state: Pichad | आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य : पिचड

आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य : पिचड

Next
िवासींना हवे स्वतंत्र राज्य : पिचड
आदिवासी प्रबोधन मेळावा : स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची मागणी
नाशिक : देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़ केंद्र सरकारने आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते़ थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची तसेच स्वतंत्र राज्याची निर्मिती न केल्यास देशभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला़
व्यासपीठावर आमदार वैभव पिचड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ऊर्मीताई मार्को, मणिरामजी मडवी, नामदेव मेश्राम, आऱ यू़ केराम, धनश्याम मडवी, दशरथ मडवी, श्याम वरखडे, सूर्यकांत उईके, नारायण सिडम आदि उपस्थित होते़
पिचड म्हणाले की, आदिवासी ही महान संस्कृती असून, तेच या देशाचे मूळ आहेत़ देशाच्या स्वातंत्र्यासाठी उठाव करून बलिदान देणारा हा समाज असून, दुर्दैवाने या समाजाचा इतिहास लिहिणारे कुणी नव्हते़ या समाजावर सतत अन्याय-अत्याचार होत गेले तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले़ आश्रमशाळा, वसतिगृहे यातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसून याविरोधात लढाई करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येण्याची आवश्यकता आहे़ मंत्रिपदाच्या काळात पेसा कायदा मंजूर केला; मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलनाची वेळ आली आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला़ तसेच या आरक्षणाबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास मुंबईकडे जाणारे पाणी अडविण्याचा इशारा त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
फोटो :- 13 नाशिक ०२
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे आयोजित आदिवासी प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन करताना माजी मंत्री मधुकर पिचड़ समवेत ऊर्मीताई मार्को, गीताश्री उरुवा आदी़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

--कोट--
आदिवासी होण्यासाठी चढाओढ
आदिवासी ही मोठी शक्ती असून, त्यांना हेतुपूरस्सर सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात मागे ठेवले गेले़ काही ठिकाणी तर आदिवासी समाजबांधव अक्षरश: गुलामीचे जीवन जगत आहेत़ खर्‍या आदिवासींच्या सवलती लाटण्यासाठी खोट्या आदिवासींची अक्षरश: रांग लागली आहे़ समाजातील बरेचसे लोक शिकून पुढे गेले; मात्र त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदनेकडे पाहिलेच नाही़ अशांनी आपल्या समाजाकडे लक्ष दिले पाहिजे़
- ऊर्मीताई मार्को, राष्ट्रीय महिला अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
आदिवासींनी राजकारणात सक्रिय व्हावे
एकेकाळी आदिवासींना राजे म्हटले जात असे. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी यासाठी समाजातील तरुणांनी राजकारणात यावे, निवडणुका लढवाव्यात व सरकारमध्ये सामील व्हावे़ जल, जमीन आणि जंगल यासाठी आदिवासींनी आपला लढा कायम ठेवला पाहिजे़
- गीताश्री उरवा, माजी मंत्री, झारखंड

Web Title: Adivasis want independent state: Pichad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.