शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी मद्रासकडे मागितला अतिरिक्त अहवाल

By admin | Updated: June 9, 2015 02:39 IST

आयआयटी मद्रासने पाठविलेला अहवाल ‘अपूर्ण’ असल्याचे सांगून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या संस्थेला अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विद्यार्थ्यांच्या एका संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या संदर्भातील आयआयटी मद्रासने पाठविलेला अहवाल ‘अपूर्ण’ असल्याचे सांगून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या संस्थेला अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.स्टडी सर्कलची मान्यता रद्द करण्याच्या वादाबाबत आयआयटी मद्रासचे संचालक सोमवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमक्ष हजर झाले होते. या संचालकांनी आयोगाकडे लेखी अहवाल सादर केला आहे. परंतु तो अपूर्ण आहे. आयआयटी मद्रासने एका सामान्य पत्रावर एवढी तीव्र प्रतिक्रिया का दिली, याबाबत संस्थेकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे, असे आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी सुनावणीनंतर पत्रकारांना सांगितले.आयआयटी मद्रासने पत्रावर मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मत मागितले होते आणि त्यानंतर आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलची मान्यता थेट रद्द केली होती. मान्यता रद्द करणे अनुचित असल्याचे मत पुनिया यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आयआयटी मद्रासला अतिरिक्त अहवाल मागविण्यात आला आहे. कारण सादर केलेला अहवाल अपूर्ण आहे. स्टडी सर्कलविरुद्ध कारवाई का केली, याचा खुलासा या अहवालातून होत नाही. या बैठकीला आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर रामामूर्ती आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव प्रवीणकुमार हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल स्टडी सर्कलची मान्यता रद्द करण्यात आली होती. परंतु यावर वादंग निर्माण झाल्यानंतर आयआयटी मद्रासने आपला निर्णय रविवारी मागे घेतला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)