"गेली ४ वर्ष माझं शारीरिक शोषण केलं..."; अभिनेत्रीचा भाजपाच्या माजी आमदारावर खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:08 IST2025-11-24T13:07:24+5:302025-11-24T13:08:39+5:30
उर्मिला सनावर यांनी व्हिडिओ करत माजी आमदारावर हे धक्कादायक आरोप केले आहेत. सनावर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.

"गेली ४ वर्ष माझं शारीरिक शोषण केलं..."; अभिनेत्रीचा भाजपाच्या माजी आमदारावर खळबळजनक आरोप
डेहराडून - हरिद्वारच्या ज्वालापूर येथील भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यावर उर्मिला सनावर या अभिनेत्रीने पुन्हा एकदा गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत उर्मिला यांनी भाजपा नेते सुरेश राठोड यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मला न्याय मिळत नाही. जर ४ दिवसांत संबंधित भाजपा नेत्यावर कारवाई झाली नाही तर भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशाराही उर्मिला सनावर यांनी दिला आहे.
उर्मिला सनावर यांनी व्हिडिओ करत माजी आमदारावर हे धक्कादायक आरोप केले आहेत. सनावर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. अभिनेत्री उर्मिला सनावर या व्हिडिओत रडताना दिसून येते. त्या म्हणतात की, मागील ४ वर्षापासून ज्वालापूरचे माजी आमदार सुरेश राठोड यांनी माझं शारीरिक आणि मानसिक शोषण केले. त्यांची पत्नी आणि मुलगीही मला सातत्याने ब्लॅकमेल करत आहे. याबाबत हरिद्वारचे एसएसपी यांना तक्रार दिली. परंतु कुठलीही ठोस कारवाई झाली नाही असं त्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर मी उर्मिला सनावर, सुरेश राठोड यांची पत्नी आहे. सुरेश राठोड यांनी माझं आयुष्य बर्बाद केले. ४ वर्षापासून माझे शारीरिक शोषण केले जात आहे. मला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. त्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. १५ जूनला माझे पती सुरेश राठोड यांनी सहारनपूर येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद यांनी उर्मिला माझी पत्नी असल्याचं म्हटलं होते, परंतु आता माझी एकच पत्नी रविंदर कौर असल्याचं ते सांगतात. महिलांना खेळणे समजलं जातंय, माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असा आरोप उर्मिला सनावर यांनी लावला.
One more Love story ended with the accusation of Rape. Actress Urmila Sanawar Rathore, Heroine of the movie "Bhabi Jee Vidhayak Hai" accused that Ex MLA Suresh Rarhore from Jwalapur, Haridwar harassed and used her. She use to post romantic reels with MLA.pic.twitter.com/BAt913EKSdhttps://t.co/bQNGbrwtEh
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) November 23, 2025
दरम्यान, दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्या पत्नी रविंदर कौर यांनी उर्मिला सनावर यांचे आरोप फेटाळले आहे. रविंदर कौर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात उर्मिला सनावर माझ्या नवऱ्याला तिचा पती असल्याचे सांगते, परंतु ती आधीच विवाहित आहे. तिच्या पतीसोबत तिने घटस्फोटही घेतला नाही. उर्मिलाविरोधात अनेक खटले सुरू आहेत. कुठल्याही पुराव्याशिवाय ती माझ्या पतीच्या नावाचा चुकीचा वापर करत आहे. उर्मिलाने खोटेनाटे आरोप करून माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहे. ज्यामुळे आमचे कुटुंब मानसिक तणावात आहे. माझे पती सुरेश राठोड यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आमच्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी तिचा हा कट आहे. आम्ही कोर्टात धाव घेतली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी रविंदर कौर यांनी केली आहे.
सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
याआधी माजी आमदार सुरेश राठो़ड आणि उर्मिला सनावर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात सुरेश राठोड उर्मिला यांच्या केसांसोबत खेळताना दिसतात. या व्हिडिओमुळे भाजपात खळबळ माजली होती. उर्मिला सनावर यांना पत्नी असल्याचं सुरेश राठोड यांनी सांगितले होते, त्यानंतर पक्षाने ६ वर्षासाठी त्यांची हकालपट्टी केली होती. आता पुन्हा सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.