actor mithun chakraborty in pm modi rally in kolkata but still suspense on sourav ganguly | ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम

ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम

ठळक मुद्देमिथुन चक्रवर्ती पंतप्रधान मोदींच्या रॅलीला उपस्थित राहण्याची शक्यतामिथुन चक्रवर्ती यांनी घेतली कैलास विजयवर्गीय यांची भेटपंतप्रधान मोदींच्या आधी मिथुन चक्रवर्ती भाषण करण्याची शक्यता

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता प्रचाराचा पारा चढताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये थेट लढत बघायला होणार असून, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. यातच पंतप्रधान मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, ते भाषणही करणार असल्याचे सांगितले जात आहे. (actor mithun chakraborty in pm modi rally in kolkata but still suspense on sourav ganguly)

मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची शनिवारी रात्री भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, त्यांच्याकडून किंवा भाजपकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीची माहिती दिली.

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

विजयवर्गीय यांची ट्विटरवरून माहिती

''सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता येथील बेलगाचिया येथे रात्री उशिरा भेट झाली. मिथुन चक्रवर्ती यांच्याशी खूप वेळ चर्चा झाली. त्यांची राष्ट्रभक्ती आणि गरिबांप्रति असलेली त्यांची कळकळ भावूक व्हायला झाले'', असे कैलास विजयवर्गीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मिथुन चक्रवर्ती करणार भाषण

कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी मिथुन चक्रवर्ती यांचे भाषण होणार असल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. 

सौरव गांगुलीबाबत सस्पेंस कायम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होतील, असे म्हटले जात आहे. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. सौरव गांगुलीदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा कयास बांधला जात आहे. सौरव गांगुली यांच्यावर अलीकडेच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या रॅलीतील सहभागाबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याशी मिथुन यांनी फोनवरून ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागी होतील, हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actor mithun chakraborty in pm modi rally in kolkata but still suspense on sourav ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.