अभिनेता चंद्रचूडचा वडिलोपार्जित बंगला बळकावण्याचा प्रयत्न; अभिनेत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:33 IST2025-12-03T20:32:57+5:302025-12-03T20:33:38+5:30
Actor Chandrachur Singh: उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये चंद्रचूड सिंहचा वडिलोपार्जित बंगला आहे.

अभिनेता चंद्रचूडचा वडिलोपार्जित बंगला बळकावण्याचा प्रयत्न; अभिनेत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Actor Chandrachur Singh: बॉलिवूड अभिनेता चंद्रचूड सिंह आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमुळे चर्चेत आले आहेत. तो सध्या उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये आला असून, आपल्या कौटुंबिक वादामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. चंद्रचूडने आरोप केला आहे की, अलीगडमधील त्याच्या वडिलोपार्जित बंगल्यावर बेकायदेशीर कब्जा करुन विकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बंगला विक्रीची कट...
चंद्रचूडने आपल्या काकीसह इतर काही नातेवाईकांवर बंगला विक्रीची कट रचल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. मंगळवारी तो आपल्या आईसमवेत जिल्हाधिकारी (DM) कार्यालयात हजर झाला आणि न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही न्यायासाठी लढत आहोत. आमचा वडिलोपार्जिक बंगला आणि जमीन वादात आहे. चुकीचे काही होऊ नये म्हणून आम्ही येथे आलो आहोत. DM साहेब आम्हाला मदत करतील.
VIDEO | Aligarh, UP: Actor Chandrachur Singh
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2025
is currently in Aligarh amid a dispute over his ancestral haveli and other properties. He has alleged that his own family members are attempting to illegally take possession of the ancestral assets. Chandrachur, accompanied by his… pic.twitter.com/vwURT7WJmq
वडिलांवर अन्याय झाला
वाद कोणासोबत आहे, असा प्रश्न विचारल्यावर त्याने स्पष्ट केले की, हा वाद कुटुंबातील लोकांसोबतच आहे. दरम्यान, हा बंगला अलीगडच्या जलालपूर परिसरात असून त्याचे नाव ‘कल्याण भवन’ आहे. DM कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. येथे त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांना कधीही त्या घरात राहू दिले नाही. पण आम्ही हा लढा सोडणार नाही.
चंद्रचूडचे 29 वर्षांचे फिल्मी करिअर
चंद्रचूड सिंह हिंदी चित्रपटसृष्टीतील एक परिचित नाव आहे. त्यांनी 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोश’ (2000) चित्रपटातही महत्त्वाची भूमिका निभावली. मागील काही वर्षांमध्ये चंद्रचूडचा एकही चित्रपट आला नाहीये.