नऊ कबड्डीपटूंचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: September 21, 2015 01:43 IST2015-09-21T01:43:41+5:302015-09-21T01:43:41+5:30

एक स्थानिक कबड्डी लढत जिंकून परतणाऱ्या संघाच्या मिनी ट्रकला झालेल्या अपघातामध्ये तब्बल नऊ खेळाडूंचा मृत्यू झाल्याची घटना ओडिशात घडली

Accidental death of nine kabaddi players | नऊ कबड्डीपटूंचा अपघाती मृत्यू

नऊ कबड्डीपटूंचा अपघाती मृत्यू

भुवनेश्वर : एक स्थानिक कबड्डी लढत जिंकून परतणाऱ्या संघाच्या मिनी ट्रकला झालेल्या अपघातामध्ये तब्बल नऊ खेळाडूंचा मृत्यू झाल्याची घटना ओडिशात घडली. संघातील अन्य ६ खेळाडू जबर जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
ओडिशा येथील सुरापल्ली (जिल्हा - सुंदरगढ) परिसरात शनिवारी रात्री हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा सेंधापूर गावचा संघ जवळच्याच धुंडीगाव येथून एक टुर्नामेंट खेळून मिनी ट्रकमधून घरी परतत होता. या वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून कोसळला. त्यात ७ खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला; तर २ खेळाडूंनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या अपघातामुळे सेंधापूर गावावर शोककळा पसरली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी
१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

Web Title: Accidental death of nine kabaddi players