त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल, अपघातात 9 ठार 5 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 20:35 IST2019-06-07T20:35:10+5:302019-06-07T20:35:41+5:30

या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.

Accident In Trisulia Ghat of gujrat, the car breaks down, 9 killed and 5 seriously injured | त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल, अपघातात 9 ठार 5 गंभीर

त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल, अपघातात 9 ठार 5 गंभीर

अहमदाबाद - गुजरातच्या त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. अम्बाजी येथील घाटात घाटात गाडीला हा अपघात झाला असून ब्रेक फेल असल्याने गाडी पलटी झाली. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने अॅम्ब्युलन्सला पाचारण करत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील मृतांबद्दल डिटेल्स माहिती अद्याप मिळाली नसून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. 


 

Web Title: Accident In Trisulia Ghat of gujrat, the car breaks down, 9 killed and 5 seriously injured