Accident: यूपीमधील भाजपा आमदाराच्या कारने दुचाकीस्वार काका पुतण्याला चिरडले, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:04 IST2022-04-18T08:57:10+5:302022-04-18T09:04:41+5:30
Accident: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एका भरधाव वेगाल आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीस्वार काका-पुतण्याला चिरडले. या अपघातात काका-पुतण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Accident: यूपीमधील भाजपा आमदाराच्या कारने दुचाकीस्वार काका पुतण्याला चिरडले, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू
लखनौ - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एका भरधाव वेगाल आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीस्वार काका-पुतण्याला चिरडले. या अपघातात काका-पुतण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही स्कॉर्पियो लखीमपूर सदर विधानसभा मतदार संघातील भाजपाआमदार योगेश वर्मा यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना लखीमपूर बहराइच रोडवर घडली. नात्याने काका-पुतण्या असलेले दोन तरुण दुचाकीवर स्वार होऊन घरी येत होते. ते रामपूरजवळ पोहोचले असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येत असलेल्या स्कॉर्पियोने धडक दिली. त्यामुळे हे दोघेही खाली पडले. या स्कॉर्पियोवर आमदार असे लिहिलेले होते. ही गाडी लखीमपूर सदर येथील आमदार योगेश वर्मा यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्कॉर्पियो योगेश वर्मा यांच्या पत्नीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. दरम्यान, जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आमदार योगेश वर्मा हे त्या गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अपघाताचं नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाही. मात्र भरधाव वेगामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहेत. या अपघाताची माहिती गावात पोहोचल्यावर मृतांच्या कुटुंबीयांचा शोक अनावर झाला होता.