शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
4
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
5
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
6
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
7
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
8
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
9
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
10
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
11
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
12
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
14
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
15
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
16
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
17
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
18
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
19
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
20
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 09:35 IST

Accident: देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे,

 -नितीन जगताप मुंबई : देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये रस्ते अपघातात १,३३,२०१ जणांचा मृत्यू झाला होता.

एकीकडे रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अद्यापही काही राज्य सरकारांनी सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला नाही. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये या कायद्यामुळे अपघाती मृत्यूत ८.३४ आणि ६.४१ टक्के घट झाली आहे. ज्या महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत, ते निश्चित करून अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, ते झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. - पीयूष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन. 

अपघाताची कारणे     घटना     मृत्यू धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे     १०३६२    ४२८५३भरधाव वेगाने वाहन चालविणे     २४०८२८    ८७०५० मद्यपान करून वाहन चालविणे     ७७१८    २९३५ सदोष वाहन चालविणे      ४३०६    २०२२ थकवा असताना वाहन चालविणे     २०५७    ९६२रस्ते पायाभूत सुविधांचा अभाव     २४४३    ११२९  नियमबाह्य वाहन पार्किंग     २७७१    १३३३  

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर४,०३,११६ देशातील अपघात३,७,१८८४ जखमी१,५५,७२२ मृत्यू 

मृतांमध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक 

 तमिळनाडूमध्ये १५,३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण  ९.८९  टक्के आहे.महाराष्ट्रात १३,९११ जणांनी जीव गमावला असून, हे प्रमाण  ८.९४  टक्के आहे.  गेल्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीड लाख लोकांमध्ये ६३ टक्के तरुणांचा समावेश आहे. राज्यांची तुलना केल्यास उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २१,७९२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशातील एकूण मृत्यूपैकी हे प्रमाण ११४ टक्के आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र