शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

'त्या' डॉक्युमेंट्रीविरोधात ABVPने दाखवला 'काश्मीर फाइल्स' चित्रपट, हैदराबाद यूनिव्हर्सिटीत राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 9:22 AM

गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरुन हैदराबाद यूनिव्हर्सिटीत SFI आणि ABVP चे कार्यकर्ते भिडले.

हैदराबाद : बीबीसीच्या डॉक्युमेट्रीवरुन (BBC Documentry) उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक विद्यापीठांमध्ये मोठा राडा होत आहे. जेएनयू आणि जामियानंतर आता हैदराबाद विद्यापीठात गुरुवारी ही डॉक्युमेंट्री दाखवण्यावरुन बराच गदारोळ झाला. येथे SFI आणि ABVP चे कार्यकर्तेय एकमेकांना भिडले. एसएफआयने बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते, तर एबीव्हीपीने 'द काश्मीर फाइल्स' फिल्म दाखवली. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.

बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत हैदराबाद विद्यापीठात एसएफआय आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या डॉक्युमेंट्रीचे स्क्रिनिंग एसएफआयने आयोजित केले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला. यापूर्वी 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने प्रशासनाच्या परवानगीशिवाय हैदराबाद विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी अहवाल मागवला होता. विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना कोणताही चित्रपट न दाखवण्याचा सल्ला दिला होता.

SFI चा दावा - 400 विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्री पाहिली

केंद्राने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला अपप्रचार म्हणत त्यावर बंदी घातली होती. असे असूनही, एसएफआयने गुरुवारी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आयोजित केले. SFI च्या म्हणण्यानुसार, हैदराबाद विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगमध्ये 400 विद्यार्थी उपस्थित होते. एसएफआयने ट्विट केले की, या विद्यार्थ्यांनी ABVP आणि प्रशासनाच्या अशांतता निर्माण करण्याचा आणि स्क्रीनिंग थांबवण्याचा खोटा प्रचार आणि प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे, अभाविपने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग केले. हा चित्रपट काश्मीरमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित आहे. 

 अभाविपचा आरोपतत्पूर्वी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य गेटवर निदर्शने केली. प्रशासनाने त्यांना स्क्रीनिंगचे साहित्य घेऊन आत येऊ दिले नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. प्रशासनाने बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला परवानगी दिली, तर आम्हाला तसे करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या एका गटाने वसतिगृहात स्क्रीनिंग ठेवल्याचे आम्हाला समजले. मात्र, आता कॅम्पसमधील परिस्थिती शांततापूर्ण आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीhyderabad-pcहैदराबादjnu - jawaharlal nehru universityजेएनयू