चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:02 PM2024-01-24T17:02:10+5:302024-01-24T17:02:51+5:30

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात.

Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham in Madhya Pradesh has made a big demand to Chief Minister Vishnudev Sai at Raipur in Chhattisgarh | चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

रायपूर: मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या शास्त्री यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. रायपूर येथे एक मोठे विधान केले असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडे चंद्रखुरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. चंद्रखुरी या जागेचे नाव बदलून कौशल्य धाम ठेवावे, असे ते म्हणाले. मागील सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले. ते दिशाहीन लोक होते, त्यामुळे येथे धर्मांतर वाढले, असे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले. तसेच मी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जाती मोजण्यात काहीच अर्थ नाही, किती गरीब आहेत आणि किती त्रस्त आहेत याचा हिशोब व्हायला हवा. मंदिरे पाडू नका, चादरी अर्पण करणे हा चमत्कार आहे, मेणबत्ती लावणे हा चमत्कार आहे, मग मी जर दैवी दरबार लावला किंवा हनुमान चालीसा वाचली तर लोकांचे पोट का दुखते, असा प्रश्न त्यांनी केला. 

चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं
खरं तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या याच कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी धर्मांतराबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात प्रचंड प्रमाणात धर्मांतर होत आहे. विशेषतः जशपूरमध्ये लोक धर्मांतर करत आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप सिंग जुदेव यांच्या कुटुंबाने घरवापसी मोहीम सुरू केली. त्यांनी लोकांचे पाय धुवून त्यांना घरी परतायला भाग पाडले. दिलीप सिंग यांच्यानंतर त्यांचा मुलगा ही जबाबदारी पार पाडत आहे.

दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांच्या घरवापसीच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भाजपा विरोधी पक्षात असताना धर्मांतर होत असल्याच आरोप केला. राज्यात आता भाजपाचे सरकार आले आहे आणि केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाने पोकळ विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये. धर्मांतराच्या विरोधात कायदा करायला हवा, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. 

Web Title: Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham in Madhya Pradesh has made a big demand to Chief Minister Vishnudev Sai at Raipur in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.