शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 3:02 PM

आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी IBच्या रिपोर्टचा हवाला देत, गुजरातमध्ये आपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली: सध्या आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता कायम राहणार, असा दावा करत आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सरकार येणार, असे दावे आप नेत्यांकडून केले जात आहेत. यातच आता आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आयबीच्या(IB) रिपोर्टचा हवाला देत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार (AAp in Gujarat) स्थापन होत असल्याचा दावा केला आहे. 

'भाजप काँग्रेसमध्ये गुप्त चर्चा'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. ते म्हणाले की, 'गुजरातच्या जनतेचे मी आभार मानतो. आयबीच्या रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये थोड्या फरकाने आपचे राज्य येणार आहे. ही रिपोर्ट पाहून भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे आता आम्हाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत मागच्या दाराने चर्चा सुरू केली आहे,' असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, आयबीच्या रिपोर्टमध्ये आम आदमी पक्षाचा विजय थोड्या फरकाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र देश आणि राज्याच्या हितासाठी हा विजय अधिक मोठा करा, असे आवाहन केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला केले आहे. आयबीचा हा अहवाल पाहिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे, असा दावाही केजरीवाल यांनी माध्यमांसमोर केला. भाजपविरोधी मते वळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. यासाठी काँग्रेसही भाजपला आतून मदत करत आहे. आपची मते कमी करण्यासाठी भाजप-काँग्रेस एकत्र आले, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

प्रति गाय प्रतिदिन 40 रुपये देण्याचे आश्वासनअरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आश्वासनाचा पुनरुच्चार केला. गुजरातमध्ये सरकार बनताच तेथील गायींसाठी विशेष भत्ता दिला जाईल, असे सांगितले. हा भत्ता प्रति गाय प्रतिदिन 40 रुपये असेल. त्यांनी गुजरातच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. भाजपचे लोक गोंधळ घालण्यासाठी सर्व युक्त्या अवलंबू शकतात, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. हे दोन्ही नेते सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपGujaratगुजरातBJPभाजपा