शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

दिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 7:47 PM

नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले.आज आपची यादी जाहीर झाली. यामध्ये 15 विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान 46 आमदारांना तिकिट देण्यात आले असून 15 आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने आज प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये केजरीवाल जरी पंसती असले तरीही मतदार आमदारांवर नाराज असल्याचे पुढे आले होते.  

आज आपची यादी जाहीर झाली. यामध्ये 15 विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे. तर 9 रिक्त जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. गेल्या वेळी आपने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. यंदाच्या यादीमध्ये 8 महिलांना संधी दिली आहे. 

या यादीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून लढणार असून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. 

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारी 

टॅग्स :AAPआपNew Delhiनवी दिल्लीElectionनिवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा