सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 10:36 IST2025-04-13T10:35:04+5:302025-04-13T10:36:18+5:30
Relationship News: मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती
मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट झाला असून, दोघांचं सूत जुळवून देणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. सासू अनिता हिचा होणारा जावई राहुल याने डिसेंबर २०२४ पासून तिच्यासोबत फोनवरून बोलण्यास सुरुवात केली होती. याबाबत अनिताचा पती जितेंद्र याने सांगितले की, त्यांच्या होणाऱ्या जावयाला सासूचा मोबाईल नंबर त्याच्या भाओजीकडून मिळाला होता.
अनिता देवीच्या पतीने याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचा होणारा जावई राहुल याचा भाओजी रुद्रपूरमध्ये राहतो. तो मेहंदी लावण्याचं काम करतो. त्याचं माझी पत्नी अनिता देवी हिच्यासोबत दोन तीन वेळा बोलणं झालं होतं. राहुल जेव्हा त्याच्या भाओजीकडे गेला, तेव्हा त्याच्याकडूनच त्याने सासूचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर अनिता आणि राहुल यांची फोनाफोनी सुरू झाली.
जितेंद्र यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला अनिता आणि राहुल बोलायचे तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं. मात्र सासू आणि जावयाचं नातं पवित्र असल्याने मला संशल आला नाही, तसेच मीही त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र या दोघांचं बोलणं अधिकच वाढलं. पुढे पुढे बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला दोन तास, तीन तास नंतर पाच तास बोलणं त्यांचं होऊ लागलं. शेवटी शेवटी तर दोघेही वीस वीस तास बोलण्यात गुंतून राहू लागले.
माझ्या मुलीचा विवाह ऑगस्ट महिन्यात ठरला होता. मात्र डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जावयाने आपल्या सासूसोबतच अधिकाधिक बोलण्यास सुरुवात केली. लग्नाची सर्व तयारी झाली होती. तसेच मी लग्नाची पत्रिका देण्यासाठी मेहुणीकडे गेलो होतो, त्याच दिवशी अनिता होणाऱ्या जावयासोबच पळून गेली, असे जितेंद्र यांनी सांगितले.