बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. यातच या निवडणुकीसंदर्भात MATRIZE-IANS चा ताज्या ओपिनियन पोलही (MATRIZE-IANS Bihar Opinion Poll 2025) समोर आला आहे. यानुसार, या निवडणुकूत एनडीएला स्पष्ट आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. जनता मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या कामावर समाधानी दिसत आहे.
सर्वेक्षणानुसार, या निवडणुकीत एनडीएला 150-160 जागा मिळण्याची शक्यत आहे. याशिवाय, महागठबंधनला केवळ 70-80 जागा आणि इतर पक्षांना 9-12 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार करता, एनडीएला 49%, महागठबंधनला 36% तर इतरांना 15% मते मिळण्याचा अंदाज आहे.
महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत एनडीएतील भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. सर्वेक्षणानुसार, भाजपला 80-85, जेडीयूला 60-65, हम (HAM) ला 3-6, एलजेपी (रामविलास) ला 4-6 आणि आरएलएमला 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. महागठबंधनमधील आरजेडीला 60-65, काँग्रेसला 7-10, सीपीआय-एमएलला 6-9, सीपीआयला 0-1, सीपीआयएमला 0-1 आणि व्हीआयपीला 2-4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हा ओपिनियन पोल बिहारच्या 243 विधानसभा मतदारसंघांतील 46,862 लोकांशी संवाद साधून तयार करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 18 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान करण्यात आले. यात ±3% चे मार्जिन ऑफ एरर आहे. या सर्वेक्षणावरून एनडीएच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे दिसत आहे. खरे तर बिहारची सत्ता कुणाला मिळते, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख, पहिल्या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर आहे. याशिवाय, अर्ज पडताळणीची तारीख, पहिल्या टप्प्यासाठी १८ ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी २१ ऑक्टोबर आहे. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख पहिल्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी २३ ऑक्टोबर आहे. या निवडणुकीची मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल.
Web Summary : Bihar opinion poll indicates NDA leading with 150-160 seats. Mahagathbandhan trails with 70-80. BJP likely to emerge as the largest party. Elections will be held in two phases, with results on November 14th.
Web Summary : बिहार ओपिनियन पोल में एनडीए को 150-160 सीटें मिलने का अनुमान है, महागठबंधन 70-80 सीटों के साथ पीछे है। बीजेपी सबसे बड़ी पार्टी बन सकती है। चुनाव दो चरणों में होंगे, परिणाम 14 नवंबर को।