"पत्नीकडून घटस्फोट घे", 8 वर्षांपूर्वीच्या प्रेयसीने दबाव टाकताच तरूणाने तिला संपवलं; मृतदेह फेकला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:11 IST2023-01-06T15:10:34+5:302023-01-06T15:11:35+5:30
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका व्यक्तीने गळा दाबून आपल्या प्रेयसीची हत्या केली.

"पत्नीकडून घटस्फोट घे", 8 वर्षांपूर्वीच्या प्रेयसीने दबाव टाकताच तरूणाने तिला संपवलं; मृतदेह फेकला विहिरीत
रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका व्यक्तीने गळा दाबून आपल्या प्रेयसीची हत्या केली. यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याने या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत होते. मात्र, आरोपी गावात लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागली आणि मग त्यांना अटक करण्यात आली.
खरं तर कोतवाली नगरमधील बरईपूर येथे राहणाऱ्या सिराजचे सलमा नावाच्या तरुणीसोबत मागील आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सिराजच्या कुटुंबीयातील लोकांनी त्याचे लग्न वेगळ्या मुलीसोबत लावून दिले. यामुळे सलमाचा राग अनावर झाला आणि तिने सिराजवर त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला. यामुळे वैतागलेल्या सिराजने आपल्या चुलत भावासोबत मिळून प्रेयसी सलमाचा काटा काढायचे ठरवले.
मृतदेह फेकला विहिरीत
31 डिसेंबर रोजी सिराजने सलमा हिला फिरायला जायचे सांगून बोलावले आणि गाडीत तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह हसनपूर येथील विहिरीत टाकून आरोपी फरार झाले. याप्रकरणी एसओजी प्रभारी प्रवीण गौतम आणि बछरावन पोलिसांचे एसएचओ नारायण कुशवाह यांनी सांगितले की, चकमकीनंतर हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची अधिक चौकशी केली जात आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"