बलात्काराच्या गुन्ह्यानंतर बरंच काही घडलं अन् आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसोबतच लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:18 IST2025-01-10T21:15:58+5:302025-01-10T21:18:19+5:30

एक घटना समोर आलीये. एका पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला. ज्या तरुणीने हा आरोप केला, तिच्यासोबत आता आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने लग्न केलं.

A lot happened after the rape case and the accused policeman married the victim. | बलात्काराच्या गुन्ह्यानंतर बरंच काही घडलं अन् आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसोबतच लग्न केलं

बलात्काराच्या गुन्ह्यानंतर बरंच काही घडलं अन् आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसोबतच लग्न केलं

एक लग्न जे उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय ठरलंय. पोलीस कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने बलाकाराचा आरोप केलेल्या तरुणीसोबत लग्न केलं आणि संसार थाटला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील आहे. कोतवालीतील शीतला माता मंदिरात दोघांचं लग्न पार पडलं. पण, यापूर्वी दोघांमध्ये बराच वाद झाला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लखनौमध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी अनुराग आणि मैनपुरी येथील तरुणीची (जिच्यासोबत लग्न झालं) तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. 

त्यानंतर दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण, नंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. २०२३ मध्ये तरुणीने पोलीस कर्मचारी असलेल्या अनुरागवर बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दिली. त्यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 

तरुणीच्या घरी जाऊन धिंगाणा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनुरागने तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो तिच्या घरीही गेला. तिला धमकावू लागला. इतकंच नाही, तर तोडफोडही केली. तरुणीने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

त्यानंतर वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन लोकांना मध्यस्थ करण्यात आले आणि तडजोड झाली. तरुणीने तक्रार मागे घेऊन लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर शुक्रवारी (१० जानेवारी) दोघांचे शीतला माता मंदिरात लग्न पार पडले. पण, या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय उपस्थित नव्हते. फक्त तरुणीची बहीण उपस्थिती होती. 

पोलीस अनुराग म्हणाला, 'लखनौमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. आम्ही खूप काळापासून रिलेशनशिपमध्ये होतो. मधल्या काळात गुन्हा आणि इतर गोष्टी घडल्या. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाबद्दल अनेक इच्छा होत्या, पण या परिस्थितीत लग्न करावं लागलं. आपण अशा पद्धतीने लग्न करतो, पण समाज आपल्याला टोमणे मारत राहतो.'

Web Title: A lot happened after the rape case and the accused policeman married the victim.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.