शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:23 IST

या देशात दहशतवाद पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होट बँक पोलिटिक्स आहे असा आरोप अमित शाह यांनी केला.

नवी दिल्ली - संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा सुरू आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप चालले आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. मी गर्वाने सांगतो, कुठलाही हिंदू कधी दहशतवादी होऊ शकत नाही असं विधान अमित शाह यांनी सभागृहात केले. विशेष म्हणजे मालेगाव स्फोटाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

२६/११ मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, काही लोक लष्कर ए तय्यबाच्या या दहशतवादी हल्ल्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा यात समावेश आहे. काँग्रेसने मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु भारतातील जनतेने त्यांचे खोटे स्वीकारले नाही. काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचं राजकारण केले. या देशात दहशतवाद पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होट बँक पोलिटिक्स आहे. त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत केली असा घणाघात त्यांनी केला. 

तसेच जम्मू काश्मीरात आज दहशतवाद कमी प्रमाणात आहे. एक काळ होता जेव्हा पाकिस्तानला इथं दहशतवादी पाठवण्याची गरज नव्हती, आपलेच युवा कट्टरपंथी बनत होते. परंतु मागील ६ महिन्यात एकाही काश्मिरी युवकाने हातात बंदूक उचलली नाही. आता जे मारले जात आहेत ते पाकिस्तानी आहेत. स्थानिक युवक दहशतवादी संघटनांमध्ये जात नाहीत. जम्मू काश्मीर इथली निवडणूकही निष्पक्षपणे पार पडली. निष्पक्षता असल्याने तिथल्या वातावरणात मोठा बदल झाला. पहलगाम हल्ल्यानंतर एकही गाव असे नव्हते जिथे या हत्यांविरोधात मोर्चा निघाला नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं.

मालेगाव स्फोटाचा आज निकाल

दरम्यान, अमित शाह यांचे विधान मालेगाव स्फोटाच्या निकालाच्या काही तास आधी आले आहे. या स्फोटाचा आरोप अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेवर आहे. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे सात जण यातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सुमारे १७ वर्षांनी विशेष एनआयए न्यायालय आज देणार आहे.   

टॅग्स :Amit Shahअमित शाहHinduहिंदूterroristदहशतवादीcongressकाँग्रेस