अधुरी प्रेम कहाणी! प्रियकराचा मृत्यू झाला अन् 'तिनं' हातावर सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:18 IST2023-03-23T19:17:35+5:302023-03-23T19:18:08+5:30

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

a girl also ended her life as the her boyfriend died in road accident in Raebareli, Uttar Pradesh  | अधुरी प्रेम कहाणी! प्रियकराचा मृत्यू झाला अन् 'तिनं' हातावर सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन

अधुरी प्रेम कहाणी! प्रियकराचा मृत्यू झाला अन् 'तिनं' हातावर सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे तरूणीला आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. खरं तर प्रेमवेड्या तरूणीने हातावर सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. माहितीनुसार, होळीच्या दिवशी 8 मार्च रोजी या मुलीच्या प्रियकराचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, मागील 15 दिवसांपासून त्रस्त असलेल्या मुलीचाही धीर सुटला चालला होता. अखेर तिने आपल्या हातावर एक हृदय पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहून ठेवली आणि जीवन संपवले.

मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता मौर्य नावाच्या तरुणीचे कुलदीप नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही दूरचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. मृत तरूणीचा प्रियकर कुलदीपचा होळीच्या दिवशी रस्ते अपघातात मृत्यू झाला. 

प्रियकराच्या मृत्यूने सुनीता अस्वस्थ 
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराच्या मृत्यूनंतर सुनीता खूप अस्वस्थ होती. ती कोणाशीच बोलत नव्हती आणि मौन बाळगलेल्या अवस्थेत असायची. याशिवाय तिने खाणेपिणेही बंद केले होते. पण ती असे पाऊल उचलेल याची घरातील कोणालाच कल्पना नव्हती. सुनीताच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरात एकच खळबळ माजली. सुनिताने आत्महत्या केली तेव्हा कुटुंबीय शेतात कामाला गेले होते. घराच्या आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांनी सुनीताला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.

दरम्यान, नातेवाईकांनी सुनीताला खाली उतरवले आणि जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर आईने एकच टाहो फोडला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: a girl also ended her life as the her boyfriend died in road accident in Raebareli, Uttar Pradesh