शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"देशात भीती पसरवण्याचे षडयंत्र"; पश्चिम आशियातील युद्धावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:28 IST

संकटकाळात भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर थेट हल्ला चढवत गंभीर आरोप केला. देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी या पक्षांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे भारतीयांची चिंता होणे स्वाभाविक आहे, कारण तिथे आपले लाखो बांधव कार्यरत आहेत. संकटकाळात भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर हल्लाबोल -पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष या जागतिक संकटातही आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. "देशात परिस्थिती बिघडावी आणि भारतीय नागरिक तिथे संकटात अडकावेत, यासाठी काँग्रेस जाणीवपूर्वक चिथावण्याचा बेजबाबदार प्रयत्न करत आहे." यातून मोदींना शिव्या देण्याचा एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, गल्फ देशांमधील मित्र राष्ट्रांच्या सरकारांकडून आपल्या नागरिकांची काळजी घेतली जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

आत्मनिर्भरतेचा आग्रह -यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा उल्लेख केला. पुन्हा भर दिला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या कार्यकाळात देशाला परकीय देशांवर अवलंबून ठेवले, तर सध्याचे सरकार देशाला स्वावलंबी बनवत आहे. ऊर्जा क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांना (EV) सरकारने मोठे प्राधान्य दिले आहे. सौर ऊर्जेची क्षमता वाढवण्यासोबतच केरळशारख्या राज्यांतही नवीन प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संकटकाळात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असल्याचे सिद्ध झाले असून, विरोधकांच्या चुकीच्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Accuses Congress of Spreading Fear Over West Asia.

Web Summary : PM Modi criticized Congress for allegedly spreading fear about the West Asia crisis for political gain. He reassured citizens that the government is working to ensure the safety of Indians abroad and emphasized the importance of self-reliance.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIranइराणWarयुद्धcongressकाँग्रेस