हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:47 IST2022-10-28T13:46:25+5:302022-10-28T13:47:19+5:30

दिल्लीत झालेल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

 A car driver crushed people in Delhi's Alipur area and 3 people were seriously injured  | हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, व्हिडीओ व्हायरल 

हृदयद्रावक! रस्त्यावर झाला वाद, संतापलेल्या कार चालकाने लोकांना चिरडले, व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अलीपूर परिसरात कार चालक आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद झाला. वादावादीदरम्यान कारमधील तरुणाने दुचाकीस्वार तरुणासह इतर लोकांना देखील कारने चिरडल्याचे पोलिसांनी सांगितले. कारने चिरडल्याने 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. वादानंतर काही वेळातच कारमधील तरुणाने काही लोकांवर कार चालवल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओवरून पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. 

आरोपी तरूणाला केले अटक 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मान असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. आरोपी नितीनला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title:  A car driver crushed people in Delhi's Alipur area and 3 people were seriously injured