मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 10:29 IST2023-05-07T10:28:50+5:302023-05-07T10:29:57+5:30
चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठौर यांची एक कथित ऑडिओ क्लिपदेखील सुरजेवाला यांनी शेअर केली.

मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’
बंगळुरू : भाजपच्या एका उमेदवाराने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी शनिवारी केला. चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठौर यांची एक कथित ऑडिओ क्लिपदेखील सुरजेवाला यांनी शेअर केली. राठौर यांनी हे आरोप फेटाळले. ऑडियो क्लिप बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले.
‘भाजपने राजकारणात खालची पातळी गाठली’
रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचे कारस्थान उघड झाले आहे. त्यातून भाजपने राजकारणात अतिशय खालची पातळी गाठली असल्याचे दिसून येते.