हृदयद्रावक! एका मुलीला ट्रेनमध्ये चढवलं अन् तोल गेला; ५ वर्षाच्या चिमुकलीसह वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:53 PM2023-07-04T13:53:48+5:302023-07-04T13:54:04+5:30

धावत्या रेल्वेमध्ये एका मुलीला सुखरूप चढवल्यानंतर दुसरीला बसवताना तोल गेल्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला.

A 5-year-old girl died along with her father at the Abu Road railway station in Rajasthan's Sirohi district  | हृदयद्रावक! एका मुलीला ट्रेनमध्ये चढवलं अन् तोल गेला; ५ वर्षाच्या चिमुकलीसह वडिलांचा मृत्यू

हृदयद्रावक! एका मुलीला ट्रेनमध्ये चढवलं अन् तोल गेला; ५ वर्षाच्या चिमुकलीसह वडिलांचा मृत्यू

googlenewsNext

सिरोही : धावत्या रेल्वेमध्ये एका मुलीला सुखरूप चढवल्यानंतर दुसरीला बसवताना तोल गेल्याने एक व्यक्ती रेल्वेखाली गेला असता त्याच्यासह मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलीसह तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर पत्नी रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील अबू रोड रेल्वे स्टेशनवरील या घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले.  

कुटुंबीयांसोबत जात होते गावी
माहितीनुसार, अनुसार भीमाराम (३६) हे पत्नी जीवी (३०), जुडवा मुली रंजीता (५) आणि मोनिका (५) यांसोबत आपल्या गावी जात असताना ही दुर्घटना घडली. साबरमती-जोधपूर पॅसेंजर ट्रेन रविवारी दुपारी १२.३५ वाजता अबू रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. भीमाराम हे आपल्या कुटुंबीयांसह ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वीच स्टेशनवर पोहोचले होते. 

मुलीला वाचवताना गेला तोल 
पण, ट्रेन येताच गोंधळाचे वातावरण झाले अन् भीमाराम यांनी घाईघाईत धावत मुलगी रंजीताला ट्रेनमध्ये बसवले. पत्नी जीवी आणि दुसरी मुलगी मोनिका मागे राहिल्या. मागे राहिलेल्या मोनिकाला घेऊन भीमाराम यांनी डब्याकडे धाव घेतली. भीमाराम आपली दुसरी मुलगी मोनिका हिला उचलून घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्याने ते मुलगी मोनिकासह फलाटाच्या मध्यभागी पडले. 

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच जीआरपी पोलीस आणि आरपीएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोघांनाही बाहेर काढून अबू रोड येथील सरकारी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवागारात ठेवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
 
  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: A 5-year-old girl died along with her father at the Abu Road railway station in Rajasthan's Sirohi district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.