गाणी ऐकत तरुणाने मृत्यूला कवटाळले; सुसाईड नोटमध्ये मुलीचे नाव लिहून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:37 IST2022-12-21T16:36:17+5:302022-12-21T16:37:15+5:30
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गाणी ऐकत तरुणाने मृत्यूला कवटाळले; सुसाईड नोटमध्ये मुलीचे नाव लिहून संपवलं जीवन
नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर दिवसेंदिवस कोटा येथे आत्महत्या करणाऱ्यांची प्रकरणे वाढत चालली आहेत. आता एका तरूणाने खोलीत गाणी ऐकत आपले जीवन संपवले आहे. संबंधित तरूणाने सुसाईट नोट देखील लिहली असल्याचे सांगितले जात आहे. त्यात त्याने एका मुलीचे नाव लिहिले असून आजच्या नंतर तो तिला कधीच भेटणार नाही असा त्यात उल्लेख आहे. तरुणाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तो गार्ड म्हणून काम करायचा. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरूणाचे नाव छोटू होते. त्याने घरातच खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतला. त्याने एक सुसाईट नोट लिहली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामध्ये एका मुलीच्या नावाचा उल्लेख आहे. मृत छोटू या तरूणाचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी 4-5 दिवसांपूर्वी माहेरी गेली असता त्याने टोकाचे पाऊल उचलले.
घरात कोणी नसताना संपवले जीवन
सायंकाळी 5च्या सुमारास छोटूने आत्महत्या केली, तेव्हा घरात कोणीच नव्हते. घरात कोणी नसताना छोटूने गाण्यांचा आवाज वाढवला आणि गळफास घेतला. आई-वडील घरी परतले असता त्यांना छोटू लटकलेल्या अवस्थेत दिसला.
पोलिसांनी मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात
रेल्वे कॉलनी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जनकराम यांनी सांगितले की, तरुणाने घरात गळफास लावून घेतला होता. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताच्या खोलीची झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"