शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची ९० टक्के आर्थिक रसद उद्योग समुहांकडून

By admin | Updated: December 24, 2014 20:55 IST

देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा ९० टक्के निधी हा उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून येत असल्याची माहिती उघड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २४ -  देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा ९० टक्के निधी हा उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून येत असल्याची माहिती उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप या राष्ट्रीय पक्षांनी निधीचा तपशील जाहीर केला असला तरी सत्ताधारी भाजपाने अद्याप निधीचा तपशील जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही. 
बुधवारी असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌ या संशोधन संस्थेने राष्ट्रीय पक्षांच्या निधीसंदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये राजकीय पक्षांचा ९० टक्के निधी हा उद्योग समुहांकडून आल्याचे उघड झाले आहे. तर निवडणूक जवळ येताच राजकीय पक्षांच्या निधीमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१२ - १३ मध्ये काँग्रेसला ११ कोटी७२ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. २०१३ -१४ मध्ये हा आकडा थेट ५९ कोटी ५८ लाखपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादी, भाकपा यांच्या उत्पन्नांमध्येही अशीच वाढ झाल्याचे एडीआरने म्हटले आहे. २०१२-१३ मध्ये भाजपाला८३ कोटी १९ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप,माकप या पक्षांचा निधी एकत्र केल्यास त्यापेक्षाही जास्त असल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले. राजकीय पक्षांना उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून मिळणारा वाढता निधी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांनी सांगितले. 
२०१३ -१४ या आर्थिक वर्षातील निधीचा तपशील जाहीर करण्याची ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख होती. काँग्रेस व अन्य राष्ट्रीय पक्षांनी त्यांचा तपशील जाहीर केला असला तरी सत्ताधारी भाजपाने अद्याप पक्षनिधीची माहितीच जाहीर केलेली नाही असे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे. सत्ताधा-यांची ही कृती दुर्दैवीच म्हणावी लागेल असे एडीआरने म्हटले आहे.