शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

९८ कोटी जमा करणाऱ्यास अटक

By admin | Updated: December 30, 2016 01:32 IST

बनावट दस्तावेज तयार करून तब्बल ९८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरणाऱ्या एका व्यावसायिकास हैदराबादेत अटक करण्यात आली. त्याच्या काही नातलगांवरही गुन्हे नोंदविण्यात

हैदराबाद : बनावट दस्तावेज तयार करून तब्बल ९८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरणाऱ्या एका व्यावसायिकास हैदराबादेत अटक करण्यात आली. त्याच्या काही नातलगांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी एकाला अटकही करण्यात आली आहे.कैलाश चंद गुप्ता (६५) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल क्राइम स्टेशन विभागाने त्याला अटक केली. फसवणूक करणे, बनावट दस्तावेज तयार करणे आणि नोटाबंदीत बेकायदेशीर लाभ मिळविणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. गुप्ता याचा मेहुणा आणि एका खासगी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक नरेदी नरेंदर कुमार (५९) यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहकार्य करणे आणि कैलाश चंद गुप्ता याला आश्रय देणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. आणखी ४0 कोटी रुपये वैष्णवी बुलियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अ‍ॅडव्हान्सपोटी मिळाल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी २१ ग्राहकांच्या नावे बनावट पावत्या तयार करण्यात आल्या. हा सर्व व्यवहार ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. हा सर्व पैसा एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेत जमा करण्यात आला होता. अनेक ग्राहक परराज्यातील दाखविण्यात आले. ग्राहकांच्या यादीतील एका महिलेची चौकशी केली असता ८ नोव्हेंबर रोजी तसेच त्यानंतर संबंधित दुकानातून आपण कोणतीही खरेदी केलेली नसल्याचे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)- गुप्ता याच्या सोन्या-चांदीच्या तीन कंपन्या आहेत. त्याची दोन मुले, एक सून आणि अन्य एक महिला त्यावर संचालक आहेत.- मुले नितीन आणि निखिल, सून स्नेहा आणि इतरांसोबत कट आखून त्याने काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.- - 3100 लोकांकडून अ‍ॅडव्हान्सच्या रुपाने ५७.८५ कोटी आपल्या मुसाद्दिलाल जेम्स अँड ज्वेलर्स प्रा. लि. या कंपनीला मिळाल्याचे दाखविले.